रानडुकर दुचाकीला धडकल्याने तिघे जखमी

0
13

गोरेगाव,दि.१५ः तालुक्यातील भंडगा मार्गावर जानाटोला गावाजवळील पेट्रोलपंपाजवळ आज १५ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास राज्यमार्गावरुन जात असलेल्या दुचाकीला रानडुकराने धडक दिल्याने तिघेजण जखमी झाल्याची घटना घडली.या घटनेत साकोली निवासी दिनेश तिलकचंद बडोले,अस्मिता दिनेश बडोले व ३ वर्षीय भुषण दिनेश बडोले या जखमींचा समावेश आहे.या घटनेत रानडुकराचा मात्र मृत्यू झाला.जखमींना रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल करण्यात आले.गोरेगाव वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन मृत रानडुकराला ताब्यात घेतले.