Home विदर्भ शिक्षक संघ अर्जुनी मोरगाव तर्फे मठ्ठा वितरीत

शिक्षक संघ अर्जुनी मोरगाव तर्फे मठ्ठा वितरीत

0

अर्जुनी मोरगाव;महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा अर्जूनी मोरगावच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही 14 एप्रिलला वर्षी क्रांतीसुर्य महात्मा फुले व परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती पर्वावर नगरात आयोजित रॅलीला मठ्ठा वाटप करून महामानवांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी संघटनेचे जिल्हा पदाधिकारी अरविंद नाकाडे, भुवन औरासे, गजानन रामटेके यांच्या मार्गदर्शनात रमेश संग्रामे, कैलास हांडगे, किशोर लंजे, प्रशांत चव्हाण, कीर्तीवर्धन मेश्राम, अरुण फाये,नितीन तिडके, नरेश वावरे, प्रकाश सांगोडे, राजेश साखरे, भास्कर लेंडे, युवराज खोब्रागडे, प्रल्हाद कापगते, सुरेश रामटेके, जयपाल रूकमोडे, अमोल चौरे, नरेश केळझरकर, ग्यानीराम कापगते, हेमराज मानापुरे, रवींद्र वालोदे,मधुकर राठोड, धनंजय मडावी, सिद्धेश्वर तांदळे, मंगेश ढोमणे, गंगाधर निखारे, टीकाराम मस्के, सुनील शहारे, मनोहर हातझाडे, मोहन नाकाडे तसेच शिक्षक संघ पदाधिकारी व शिक्षक बंधू बहुसंख्येने उपस्थित होते.

सरस्वती विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
अर्जुनी मोर.:- स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जी.एम.बी. हायस्कूल,सरस्वती विद्यानिकेतन प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य जे.डी.पठाण तर प्रमुख उपस्थिती शाळेच्या उपप्राचार्या छाया घाटे, पर्यवेक्षक महेश पालीवाल,जी.एम.बी.च्या प्राचार्य शव्या जैन, सरस्वती विद्यानिकेतन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना भूते,प्रा.टोपेश बिसेन, शशिकांत लोणारे यांची होती. सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून प्राचार्य जे.डी. पठाण यांनी सांगितले की विपरीत परिस्थितीतही खचुन न जाता आत्मविश्वासाने मार्गक्रमण करावे. या दिनाचे औचित्य साधून वर्ग नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन करून आभार दीपेश्वरी मेंढे यांनी मांनले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version