Home विदर्भ बहुजनांनो संविधान वाचविण्यासाठी पाहारेकरी व्हा-पत्रकार नवीन कुमार

बहुजनांनो संविधान वाचविण्यासाठी पाहारेकरी व्हा-पत्रकार नवीन कुमार

0

गोंदियात डॉ आंबेडकर जयंती उत्साहात

गोंदिया ता.15:- जगात भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ आहे. आम्ही भारतीय संविधानाची प्रार्थना करतो, लोकशाहीची पूजा करतो आणि संविधान निर्माता डॉ बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो ही आमची विचार सरणी आहे. ही विचारसरणी मणात बाळगून बहुजनांनो संविधान वाचविण्यासाठी पाहारेकरी व्हा असे आवाहन यु ट्यूब चॅनेल आर्टिकल 19 चे संपादक नविन कुमार यांनी (ता.14) केले.येथील सुभाष शाळेच्या मैदानावर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 133 व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्व. जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गेंदलाल तिरपुडे हे होते. मंचावर राज्यसभा TV चे माजी निदेशक उर्मिल उर्मिलेश, विविध समाजातील सत्कार्मुर्ती सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना नवीणकुमार म्हणाले की, महिलांच्या कल्यानासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत हिंदू कोडबील आणलं. परंतु महिलांना संपत्तीचा अधिकार मिळेल, त्यांना सोडचिट्ठी देण्याचा अधिकार राहील त्यामुळे एक संकट उभे राहील अशी विचारसरणी बाळगून मनुस्मृतीच्या हस्तकांनी याला विरोध केला, असे सांगून मणिपूरची घटना हे असेच षडयंत्र आहे असे ते म्हणाले.त्यांनी शिक्षणाच्या खाजगीकरनावरजोरदार हल्ला चढवीला ते म्हणाले,भांडवलशाही मुळे लोकशाहीला धोका आहे. कारण यामुळे लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवता येतो, खाजगीकरणाला वाव मिळतो. भारतात 535 विद्यापीठ अस्तित्वात आहेत परंतु या विद्यापिठामध्य SC, ST, आणि OBC लोकांना किती प्रतिनिधित्व मिळाला आहे? असा उलट प्रश्न त्यांनी केला.
यावेळी पत्रकार उर्मिलेश यांनीही आपले विचार मांडले. गोंदियात सकाळपासूनच ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. विविध सामाजिक संघटनानी रॅलीतील सहकाऱ्याना पाणी, अलपोहार, फळफ्रुट, थंड पेय प्रदान करण्यासाठी स्टॉल्स लावले होते.दरम्यान जयंती कार्यक्रमात महिलांनी सादर केलेल्या लेझीम नृत्यानी उपस्थिताना मंत्रमुग्ध केलं. बालाघाटचे संगीतकार प्रकाश सागर यांनी भीमगित सादर केले.
समाजिक कार्येकर्ते सविता बेदरकर, विलास वासनिक आणि मालती किन्नाके तसेच सामाजिक विचारवन्त कार्यकर्त्यांना, महार बटालियन 7 च्या सैनिकांना संविधानाची उद्देशीका व पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
पाहुण्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासचिव मच्छिन्द्र भेलावे यांनी,संचालन ऍडव्होकेट एकता गणवीर आणि स्वाती वालदे यांनी तर आभार जयंतीचे अध्यक्ष श्री तिरपुडे यांनी मानले. यावेळी आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्याने उपस्थित होते.

Exit mobile version