डॉ. आंबेडकरांमुळेच मानव समाजाचे कल्याण – भागचंद रहांगडाले

0
2

सटवा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी
गोरेगांव – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विविध देशातील संविधानाचा सखोल अभ्यास करून भारताला एकसंघ ठेवणारे भारतीय संविधान तयार केले. या संविधानामुळेच समस्त मानव समाजाचे सर्वांगीण कल्याण साधला जात असल्याचे प्रतिपादन भागचंद रहांगडाले यांनी केले.
तालुक्यातील सटवा येथे 14 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अर्चना ठाकूर तर उद्घाटक म्हणून उपसरपंच विनोद पारधी उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलिस पाटील टिकाराम रहांगडाले, माजी सरपंच महादेव राणे, कन्हैयालाल कोल्हे, भोजराज बघेले, ग्रामपंचायत सदस्या रामेश्वरी रहांगडाले, भुमेश्वरी पटले, रामबत्ता रहांगडाले, हिरकण बाई ठाकूर, नूतन बिसेन, ग्रामपंचायत सदस्य संजय ठाकूर, ओमेंद्र ठाकूर आदी उपस्थित होते. सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष कन्हैयालाल कोल्हे, उपसरपंच विनोद पारधी यांनीही समयोचीत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन कटरे यांनी तर आभारप्रदर्शन कुलदीप वैद्य यांनी केले.