लोकसभा निवड्णुकीसाठी विधानसभा मतदार केंद्रावर आरोग्य विभागाची गस्ती

0
8

गोंदिया- लोकसभा सार्वत्रिक निवड्णुक कार्यक्रमानुसार पहिल्या टप्प्यात दि.19 एप्रिल रोजी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात मतदार करण्यासाठी गोंदिया जिल्हाधिकारी प्रशासनामार्फत तयारी पुर्ण झालेली आहे.जिल्ह्यात लोकसभेची सार्वत्रिक निवडणुक शांततेत पार पाडावी यासाठी सर्व विभागातील यंत्रणा कार्यान्वीत झालेली आहे.
जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात दि.19 एप्रिल रोजी मतदान केंद्रावर अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.दि.18 रोजी जिल्हास्तरावरुन पोलींग पार्ट्या मतदान केंद्रासाठी निवडणुक साहीत्यासह चारही विधानसभा मतदार संघात पोहचणार आहे.जिल्हा आरोग्य प्रशासनामार्फत आरोग्याच्या दृष्टीकोनातुन सर्व बाबी पुर्णत्वास आल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी दिली आहे.
देवरी, तिरोडा, अर्जुनी मोरगाव व गोंदिया विधानसभा मतदान संघात दि. 18 रोजी तालुका केंद्रावर सर्व मतदान साहित्य, अधिकारी व कर्मचारी पोहचणार आहेत. तेथुन सर्व मतदान बुथनिहाय साहित्य व पोलींग पार्ट्या आपल्या नियुक्त बुथ नुसार मार्गक्रमण करणार आहेत.
गोंदिया तालुक्यातील शासकिय तंत्रनिकेतन पॉलीटेक्नीक कॉलेज फुलचुर पेठ, तिरोडा तालुक्यात शासकिय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र ,देवरी तालुक्यात आय.टी. आय.कॉलेज व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती या चारही विधानसभा मतदार संघात पोलींग पार्ट्या अधिकारी व कर्मचारी यांचे साहित्यासह डेरा होता.
चारही विधानसभा केंद्रातील वरिल ठिकाणी त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी तालुका आरोग्य प्रशासनामार्फत तपासणी चमुमार्फत आरोग्य सेवा प्रदान करण्यात आली. देवरी येथील आरोग्य पथकामध्ये सामुदायिक आरोग्य अधिकारी यशस्वी चौरसीया, आरोग्य सेविका कल्पना ढोमणे, आरोग्य सेवक ओमप्रकाश लेदे,वाहन चालक विजय भेलावे यांनी आरोग्य सेवा दिली.
तिरोडा तालुक्यात आरोग्य चमु मध्ये डॉ सुबोध थोटे तालुका आरोग्य अधिकारी, लिलाधर निपाने आरोग्य सहाय्यक, सुरेश येरणे निमवैद्यकीय कर्मचारी, प्रीती बोरकर सिकलसेल एजुकेटर, विजय चंद्रिकापुरे वाहन चालक, विश्वजित चव्हाण परिचर, आरोग्य सेविका कुंदा साखरवडे, आरोग्य सेवक अनमोल चव्हाण यांनी आरोग्य सेवा दिली .
गोंदिया तालुक्यात आरोग्य सेवक जगदिश उके, आरोग्य सेविका अश्विनी गोंधुडे व वाहन चालक शेखर शरणागत यांनी आरोग्य सेवा दिली.