मंगरूळपीर:- मंगरूळपीर ते मानोरा रोडवरील कोळंबी फाट्याजवळ झालेल्या समोरासमोर दोन कारची धडक होऊन त्या अपघातात दोन जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे.मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार, २ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील(Buldhana District) मेहकर येथील रहिवासी अंकित विलास खडसे वय २८ वर्ष, व निखिल विजय शेळके व ३४ वर्ष ,आणि प्रशांत रहाटे शुभम गोडे निखिल बाजड हे सर्व मानोरा येथील एकामित्राच्या लग्न समारंभासाठी (wedding ceremony) जात असताना मंगरूळपीर जवळील कोळंबी वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारची समोरासमोर टक्कर झाली असून लग्न समारंभात जाण्यापूर्वीच काळाने झडप घालून त्यामध्ये अंकित विलास खडसे, आणि निखिल विजय शेळके, राहणार मेहकर यांचा या अपघातात मृत्यू (Accidental death) झाला आहे.
तर प्रशांत रहाटे, शुभम गोडे, निखिल बाजड, हे गंभीर जखमी झाले आहे यांना पुढील उपचारासाठी अकोला (Akola)येथे रेफर करण्यात आले. तर समोरील कारचा चालक जखमी झाला असून त्याला उपचारातील वाशिम येथे दाखल करण्यात आले होते. मृतकाचे शव उत्तरणीय तपासणीसाठी पाठवण्यात आले पुढील ते तपास पोलीस स्टेशन करीत आहे.