अर्जुनी मोर पोलिसांनी घडवून आणली पिता पुत्रांची भेट

0
17

अर्जुनी मोर. -4 मे 2024 रोजी भीमराव देवराव सांगळे वय ६० वर्ष जवळका तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा हे देव दर्शनासाठी शेगाव येथे आले होते. त्यांना स्मृतीभंश चा त्रास असल्याने त्यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती. त्यामुळे शेगाव येथून ते रस्ता विसरले. त्यानंतर ते वेगवेगळ्या वाहनातून व पायी भटकत भटकत दिनांक 9 मे रोजी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोर. तालुक्यातील मौजा कोरंभी या गावी आले. सदर बाबत गावचे सरपंच सुशील प्रेमलाल टेंभुर्णे यांनी माहिती अर्जुनी मोर. पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांना दिली. संबंधित भटकत आलेला इसम भीमराव देवराव सांगळे यास पोलीस ठाण्यास आणून त्याला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याचे गावाचे नाव व पत्ता माहीत झाल्याने पोलिसांनी सदर ठिकाणी संपर्क करून माहिती त्यांचा मुलगा केशव भीमराव सांगळे यांना दिली. किशोर भीमराव सांगळे यांची घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांना येण्यासाठी वेळ लागणार असल्याचे कळवले त्यावरून पोलिसांनी भीमराव देवराव सांगळे यांची पोलीस ठाणे येथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली. आज रोजी किशोर भीमराव सांगळे हे त्यांच्या वडिलांना घेण्यासाठी पोलीस ठाण्यास आले असता दोघा पिता पुत्रांची भेट झाली व दोघांचेही अश्रू अनावर झाले. पोलिसांनी भीमराव देवराव सांगळे यांना नवीन कपडे देऊन प्रेमाने त्यांच्या मुलाच्या ताब्यात देऊन त्यांच्या मूळ गावी रवाना केले. पोलिसांनी केलेल्या कामाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.