गोंदिया– सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे सुरु असून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातही इंडियाआघाडीच्या उमेदवारासह देशात इंडिया आघाडी मोठ्यासंख्येने लोकसभेच्या जागा जिंकणार आहे.आमच्या पक्षाने गोंदिया जिल्ह्यात इंडिया आघाडीसोबत लोकसभेत काम करीत असतांना आजही शिक्षण,आरोग्य,विज व पाण्याचे प्रश्न ग्रामीण भागात कायम‘ असल्याचे निदर्शनास आले.त्यामुळे येत्या काळात आम आदमी पार्टीच्यावतीने जिल्ह्यात शिक्षण,आरोग्य,विज व पाण्याच्या प्रश्नावर मोठे आंदोलन करण्यात येणार असल्या माहिती आम आदमी पार्टीचे तालुका प्रमुख शैलेष बैस यानी पत्रपरिषदेत दिली.
यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश दमाये,मि‘लन चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.बैस यांनी गोंदिया जिल्ह्यात प्राथमि‘क शिक्षणाच्या सुविधा ग्रामपातळीवर चांगल्या दर्जासह असायला हव्यात,मात्र त्या नाहीत त्यातच सरकार खासगीकरणाच्या माध्यमातून सरकारी शाळा बंद करण्याचा घाट घालत असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी,शेतमजूरांना आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण देणे अवघड झाले आहे.तर आरोग्याच्या पाहिजे तशा सुविधा अद्यापही उपलब्ध नाहीत.तर सध्या प्रधानमंत्री यांची ‘महत्वाकांक्षी योजना जलजीवन मि‘शन ही जिल्ह्यात सुरु आहे.या योजनेत मोठ्या प्रमाणात गौडबंगाल असून कोट्यवधीचा निधी मि‘ळूनही गुणवत्ताहीन कामे केली जात असल्याचा आरोपही बैस यांनी पत्रकार परिषदेत केला.