गोंदिया, दि.16 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय व जिल्हा वकील संघ गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया येथे ‘जागतिक पाणी व पृथ्वी दिवस’ निमित्ताने कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष ए.टी.वानखेडे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून तदर्थ जिल्हा न्यायाधीश-1 एन.बी.लवटे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एस.व्ही.पिंपळे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष टी.बी.कटरे, ए.जी.पाटणकर व तज्ञ मार्गदर्शक म्हणून गोंदिया येथील नमाद महाविद्यालयाचे भूगोल विभागाचे प्रा.डॉ.शशीकांत कडू, तसेच सर्व न्यायीक अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी व सर्व वकील वर्ग कार्यक्रमास उपस्थित होते.
यावेळी प्रा.डॉ.शशीकांत कडू यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वॉटर पॉलिसी बद्दल व वर्तमान काळात पाण्याची आवश्यकता, पाण्याचा अपव्यय, भविष्यातील गंभीर संकट व त्यावरील उपाययोजना याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.टी.वानखेडे यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या पाण्यावरील उपाययोजना कशाप्रकारे राष्ट्राला उभारी देतात, त्यांनी स्वत: बांधलेले पाण्याचे डॅम, नदी-जोड प्रकल्प व इतर उपाययोजना, तसेच मानवी जीवनात पाण्याचे महत्व व भविष्यात पाण्याच्या उदभवणाऱ्या समस्या, वर्तमान काळात पाण्याचे संरक्षण करणे किती गरजेचे आहे व नैसर्गिक चक्र सुरळीत ठेवणे किती गरजेचे आहे याविषयी विस्तृत माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. मंगला बंसोड यांनी केले, तर उपस्थितांचे आभार ॲड. अतुल येळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे कर्मचारी अधीक्षक पी.बी.अनकर, कनिष्ठ लिपीक एस.एम.कठाणे, पी.एन.गजभिये, एस.डी.गेडाम, पी.डी.जेंगठे, के.एस.चौरे, एल.ए.दर्वे तसेच शिपाई बी.डब्ल्यू.पारधी, आर.ए.मेंढे यांनी मोलाचे सहकार्य केले.