तथागत गौतम बुद्ध पोर्णिमेच्या निमित्त आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते ५४ लाभार्थ्यानां कर्णयंत्राचे वाटप

0
11

#जनता कि पार्टी (चाबी) संघटनच्या वतीने भगवान गौतम बुद्ध जयंती साजरी

गोंदिया –जिल्ह्यात सर्वाधिक दिव्यांगांची संख्या एकट्या गोंदिया तालुक्यात आहे. याचा आढावा घेताना आमदार विनोद अग्रवाल यांनी वारंवार दिव्यांगणसाठी भरघोस शासकीय मदत मिळावी यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत. याचाच एक भाग म्हणून तथागत गौतम बुद्ध पोर्णिमेच्या शुभदिनी दिव्यंगांसाठी मदतीचा हात पुढे करत कर्णबधिर नागरिकांसाठी तपासणी व करण्यंत्रांचा वाटप करण्यात आला. यामध्ये गोंदिया तहसील व्यतिरिक्त इतर ठिकाणाहून सुद्धा नागरिकांनी सहभाग नोंदवत तपासणी करत कर्णयंत्र प्राप्त केले. आज एक दिवसात जवळपास ५४ लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.
तथागत गौतम बुद्ध पोर्णिमेच्या निमित्त आज आमदार विनोद अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयात सामूहिक तथागत गौतम बुद्ध वंदना करण्यात आली. यामध्ये जनता की पार्टी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लाभार्थी उपस्थित होते. बुद्धाने जगाला शांतीचा मार्ग दिला आणि त्याच मार्गावर चालत आज भारताला वेगळी ओळख निर्माण झाली आहे. भारताला शांतीचा प्रतिक म्हणून ओळख मिळाली ती केवळ तथागत गौतम बुद्ध लाभले आणि त्यांनी आपल्या देशात कार्य करून जगाला शांतीचा संदेश दिला. नागरिकांनी बुद्धाचे उपदेश घेवून जीवन व्यापण केल्यास जीवनात अनेक संकटांना सामोरे जाण्याची ताकद मिळते असे आमदार विनोद अग्रवाल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात आमदार विनोद अग्रवाल यांच्यासह चाबी संघटनेचे अध्यक्ष भाऊराव उके, शहर अध्यक्ष कशिश जैसवाल, महिला आघाडी अध्यक्ष चैताली नागपुरे, जि.प. सदस्य वैशाली पंधरे, जि.प. सदस्य आनंदा वाढीवा, जि.प. सदस्य दीपाताई चंद्रिकापुरे, माजी बांधकाम सभापती घनश्याम पानतावणे, राम पुरोहित, उत्तम मंडीया, लखन हरीनखेडे, महेश मेश्राम, राजू कटरे, सुर्यामानी रामटेके, हर्षपाल रंगारी, गुलशन दहाट, प्रीतम मेश्राम, रंजित बारलिंगे, उमेशसिंह पंडेले, दिलीप सिंह मुंडेले, लीमेंद्र बिसेन, प्रभाकर ढोमणे, अनिल हुंदानी, मोहन गौतम, प.स. सदस्य शैलजा सोनवाणे, शैलेश चौरे, विजय ठोकणे, अजित टेंभरे, नितेश गडपायले, अभय मानकर, सरपंच ग्रा.प. चुटिया कैलाश गजभिये, परसराम हुमे, धर्मेंद्र डोहारे, कमलेश सोनवाने, धर्मेश बेबी अग्रवाल, हुमानदास पटले, राम पुरोहित, अहमद मनियार, विवेक मिश्रा, संदीप तुरकर, दीपक बोबडे व इतर कार्यकर्ता एंव नागरिक उपस्थित होते.