बुध्दीस्ट सोसायटी संस्थेच्या राष्ट्रीय सल्लागार समीती सदस्य पदी राजकुमार बडोले यांची नियुक्ती

0
18
वाढदिवसाच्या शुभेच्छा

अर्जुनी मोर. — महामानव परमपुज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या “द बुध्दीस्ट सोसायटी आॅफ इंडिया ” संस्थेच्या राष्ट्रीय सल्लागार समीती चे सदस्य म्हणून राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ईंजी राजकुमार बडोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवडणुक द बुध्दीस्ट सोसायटी आॅफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष आयु.चंद्रबोधी पाटील तसेच संस्थेच्या सर्व केंद्रिय कार्यकारीणी ने केली आहे.
बौध्द धम्माचे तत्वज्ञान व विचारधारा संपुर्ण भारत वर्षात पसरविण्याचे एक महान कार्य सदर सोसायटीच्या मार्फत करण्यात येते.बुध्दाच्या प्रेम, दया,अहिंसा, स्वातंत्र व समता या विचारधारेचे तत्वज्ञान मानव कल्याणासाठी उपयुक्त असुन सदर संस्थेच्या माध्यमातून मानव समाजामधे एकता एकात्मता व बंधुभावाची भावना ज़ोपासण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जाते.माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या निवडीमुळे सदर राष्ट्रीय सल्लागार समीतीवर एक सल्लागार म्हणून अमुल्य वेळ व प्रतिभेचा निश्चितच उपयोग होईल.
माजी मंत्री राजकुमार बडोले यांची द बुध्दीस्ट सोसायटी आॅफ इंडिया संस्थेच्या राष्ट्रीय सल्लागार समीती वर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील बुध्दीस्ट सोसायटी आॅफ इंडिया चे जिल्हा कार्यकारीणी तथा दोन्ही जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय पदाधिकारी तसेच विश्वजीत डोंगरे, शिलाताई चव्हाण, राजहंस ढोक, व्यंकट खोब्रागडे, दिपंकर उके, सुरेंद्रकुमार ठवरे,मिनाताई शहारे, कविताताई रंगारी, ओमकार टेंभुर्णे, विवेक राऊत,चंद्रशेखर रामटेके, सुमेंद्र धमगाये, किशोर मेश्राम,मिथुन टेंभुर्णे, मुरारी घोडेस्वार, अरविंद जांभुळकर, रुपचंद खोब्रागडे, विलास बन्सोड,सुभाष मेश्राम, राजकुमार उंदिरवाडे, नरेश खोब्रागडे, किशोर शेंडे,
ईश्वर खोब्रागडे, शितलताई लाडे, अजय अंबादे, जिजीराम शेंडे, सोनुताई क-हाडे आदिंनी माजी मंत्री राजकुमार बडोले यांचे अभिनंदन केले आहे.