अर्जुनी मोरगाव तालुक्यात प्रौढाचा उष्माघाताने मृत्यू

0
15

गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील निमगाव येथील सुरेश उरकुडा गेडाम (४५) या प्रौढाचा उष्माघाताने मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी (दि.३१) दुपारी ४ वाजता सुमारास घडली.सुरेशचा सांभाळ त्याची म्हातारी आई करीत होती. गावात फिरणे हा त्यांचा नित्यनेम होता. प्रकृती ठणठणीत असताना शुक्रवारी दुपारी उन्हामुळे त्याची प्रकृती एकाएकी बिघडली. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला गावातील डॉक्टरकडे उपचारासाठी नेले.

त्याच्यावर औषधोपचार करण्यात आला. परंतु काही क्षणातच सुरेशचा मृत्यू झाला. मागील दोन दिवसापासून गोंदिया जिल्ह्याच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी (दि.३१) जिल्ह्यात मौसमातील सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वाढत्या तापमानाचा मानवी आरोग्यावर परिणाम होत असून उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.