स्थलांतरित मजूरांनो रक्ताची तपासणी अवश्य करा-डॉ.विनोद चव्हाण, जिल्हा हिवताप अधिकारी

0
13

गोंदिया -जिल्ह्याची सीमा ही मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्याला व गडचिरोली जिल्ह्याला लागून आहे. दरवर्षी जिल्ह्यातील मजूर हे तेंदू पत्ता, पत्ता सीजन, बास कटाई, बांधकाम, रस्ता कामे व इतर विविध कामानिमित्त स्थलांतरित करीत असतात. परंतु तिथे गेल्याने आपल्या आरोग्याची काळजी न करता दिवस रात्री कामे करुन उघड्यावरती झोपत असतात. गोंदिया लागून असलेल्या सीमा भागात जंगलव्याप्त भाग असल्याने परतीच्या वेळी येताना आजारी किंवा हिवताप संसर्ग घेऊन येण्याची शक्यता असते.
तरी परतीच्या वेळी आल्यानंतर कुठलेही ताप सदृश्य किंवा इतर लक्षणे आढळून आल्यास शासकीय आरोग्य संस्थेमध्ये जावे तसेच गावपातळीवर आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका यांचे जवळ हिवताप चाचणी संबंधाने आर डी के. (जलद ताप सर्वेक्षण कीट) उपलब्ध आहे. तरी कुठलाही ताप कमी न समजता रक्ताची तपासणी करून घेण्याबाबतचे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांनी केले आहे.
दि.31 मे रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र घोनाडी येथील उपकेंद्र आलेवाडा येथे तेंदुपत्ता कामावरुन आल्यानंतर मजुरांचे रक्त तपासणी करताना आरोग्य पथक त्यात आरोग्य सेवक आय.पी.पालेवार, आरोग्य सेवक एस.आर.रोकडे,आरोग्य सेविका डी.ए.खरवडे, आशा सेविका देवकी कुंभरे तर दि.1 जुन रोजी प्राथमिक आरोग्य केन्द्र गोठणगाव अंतर्गत सुरबन गावात मजुरांचे रक्त तपासणी करताना आरोग्य सेवक अमोल मालेकर व आशा सेविका भाग्यश्री राणे.
स्थलांतरित मजूरांनो हिवताप सदृश्य कुठलीही लक्षणे जसे ताप,सर्दी,अंगदुखी, मळमळ, उलटी,जुलाब,ह्गवण व अतिसार इत्यादी लक्षणे दिसल्यास कुठल्याही भोंदुबाबा किंवा अप्रशिक्षित पदवी नसलेल्या डॉक्टरांना न दाखवता जवळच्या शासकीय दवाखान्यात जाऊन तपासणी करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे यांनी केले आहे.