गोंदिया-गोंदिया जिल्ह्यातील फुले शाहू आंबेडकरी विचाराचे ओबीसी बहुजन चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवणारे ओबीसी चळवळीचे जिल्ह्यातील सक्रिय पदाधिकारी व प्राथमिक शिक्षक पेमेंद्र चव्हाण(मूळ गाव डव्वा,ता.सडक अर्जुनी)यांचे आज ३ जून रोजी दिर्घ आजाराने नागपूरातील रुग्णालयात दुःखद निधन झाले.मृत्यूपंंरात त्यांनी आपले डोळे दान करुन नवी दिशा दिली आहे.त्यांच्या मृत्यूने गोंदिया जिल्ह्यातील ओबीसी चळवळीला मोठा धक्का बसला आहे.पेमेंद्र चव्हाण यांच्या मागे आई,दोन भाऊ पत्नी,२ मुले,१ मुलगी अशा बराच मोठा परिवार आहे.त्यांच्यावर उद्या ४ जून रोजी गोंदिया येथील मोक्षधाम येथे दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.अंत्ययात्रा कन्हारटोली उपवंशी मेडीकल स्टोर्स समोरच्या गल्लीतील त्यांच्या निवासस्थान येथून निघेल.