अतिसार नियंत्रण पंधरवाडा 6 ते 21 जुन 2024 बालकांना मिळणार अतिसार विरोधी औषधी

0
120

गोंदिया -राज्यातील अर्भक मुत्यु दर, बाल मुत्यू दर, कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानचे प्रमुख उदिष्ट आहे.देशातील 5 वर्षापर्यंतच्या बालकाच्या मुत्यू मागे अतिसार हे प्रमुख कारण असून सुमारे 10 टक्के बालके अतिसारामुळे दगवतात आणि त्या बालमुत्यूचे प्रमाण उन्हाळ्यात व पावसाळ्यात जास्त असते, यामुळे मागील वर्षीच्या अतिसार नियंत्रण पंधरवडाच्या यशस्वी प्रयत्नानानंतर यावर्षी अतिसारमुळे होणारे बालमुत्यू  शुन्य  करणे उदिष्ट समोर ठेऊन जिल्ह्यात 6 जुन ते 21 जुन 2024 या कालावधित विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा हीं योजना राबविण्याचे ठरविले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी म्हटले आहे.
या कालावधित अतिसारामध्ये घ्यावयाची काळजी ,ओआरएस व झिंक गोळ्या यांच्या वापर,हात धुण्याच्या पद्धती याबाबत प्रात्यक्षिक आशा स्वयसेविका मार्फत करण्यात येणात आहे.सर्व आरोग्य संस्थेमध्ये ओआरएस व झिक कोपरा स्थापन करणे, अतिसार झालेल्या कुपोषित बालकावर उपचार या बाबीचा सुद्धा समावेश आहे. यामध्ये विशेष सर्वेक्षणात प्रत्येक घरी आशा सेविका मार्फत गृहभेटी दरम्यान 0 ते 5 वर्षातील बालकांना भेटी देवुन त्यांच्या प्रकृतीची चौकशी करुन अतिसार लक्षणे असलेल्या बालकांचा शोध घेण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे यांनी दिली आहे.
या मोहिमेत जिल्ह्यातील 1238 आशा स्वयसेविका यांच्या मार्फत गावात प्रत्येक दिवशी गृहभेटीतुन घरांना भेटी देणार आहेत. बालकांबाबत अतिसार संबधाने माहिती घेऊन घरातील पालकाला ओ.आर.एस.द्रावण तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविणार व स्वच्छतेचे महत्व पटवुन सांगण्यात येणार असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक अमरीश मोहबे यांनी दिली आहे.
नागरिकानी घरी येणार्या आरोग्य पथकाला खरी माहीती देवुन 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना आशा सेविका मार्फत तपासणी करण्याबाबत आरोग्य विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रोशन राऊत यांनी केले आहे.