प्रगत महाराष्ट्रात मनुस्मृती जिवंत होणे हे दुर्दैव-खेमराज हरिणखेडे

0
23

गोंदिया :- माणसाला माणूसपणाचे जीवन जगण्या पासून वंचित करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी समता मुलक समाज व्यवस्था निर्माण केली. परंतु आता प्रगत महाराष्ट्रात मनुस्मृती पुनःसच जिवंत होऊ पाहत आहे हे दुर्दैव आहे, अशी खंत बालाघाटचे आंबेडकरी विचारवंत खेमराज हरिणखेडे यांनी व्यक्त केली. येथील बुद्धिस्ट समाज संघ प्रणित संथागार येथे आयोजित 491 असेंबली कार्यकमात श्री हरिणखेडे बोलत होते. संथागारचे मुख्य व्यवस्थापक प्रा. रोशन मडामे होते. मंचावर सत्कार्मुर्ती आणि संविधान महोत्सव समितीचे अध्यक्ष (बोधाचार्य व श्रामणेर) सुशील गणवीर यानी आपल्या धम्म प्रबोधन करतानी सांगितले की मुलानी धम्म चा आचरण आणि पालन कसे करावें विस्तृत माहती दिले. हरिणखेडे म्हणाले की, महात्मा फुल्यांनी 1848 ला बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे उघडली ते काम मनुस्मृतीला एक आव्हान होते. फुले शाहू आंबेडकरी विचारधारेने प्रस्थापित मनुवाद्यांचे मनसूबे हाणून पाडण्याचे काम केले आहे,नेमकी ही बाब सरकारच्या डोळ्यात खटकणारी ठरली परिणामी पाठ्यक्रमातून आता मनुस्मृतीला जीवनदान देण्याचे काम सरकारने सुरु केले आहे, हे काम बहुजन समाजाने हाणून पाडाव असे आवाहन  हरीणखेडे यांनी केले.याप्रसंगी सुशील गणवीर यांच्यावतीने इयत्ता 10 विच्या परीक्षेत गुणवंत( मैरिट) ठरलेल्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांमध्ये रिया गेडाम 98.60%, अंशुल साखरे 97.00%, आर्यन मेश्राम 96.20%, संपदा वाघमारे 92.00%, प्रशील वाहणे 85% (CBSC), उदय मेश्राम 85%(CBSC), पलक डोंगरे 92.40%, श्रुती मेश्राम ,इशांत गजभिये 93. 20%, केतकी चौरे 94. 80%, नैतिक फुलेकर 92.20%, वृंदा शिंगाडे 91.80%, यश बनसोड 91.80%, वेदांत नागदेवे 91.40%, श्रावणी पाणतावणे 90.60%, आदित्य बागडे 95. 40%, यांचा सत्कार करण्यात आला.असेंबलीचे भोजनदान दाते सुशील गणवीरर आणि गणवीर परिवार यांनी भोजन दिले.याप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्व. जयंती उत्सव समिती, संविधान महोत्सव समिती, आणि बोधिसत्व बुद्ध विहार संविधान चौक छोटा गोंदिया, नागार्जुन बुद्ध विहार ओल्ड गोंदिया, पंचशील बुद्ध विहार माता टोली, गोंदिया, पाटलिपुत्र बुद्ध विहार गोविंदपुर गोंदिया, सावित्रीबाई फुले फ्लॉवर ग्रुप गोंदिया, संथागार मॅरीज ब्यूरो ग्रुप च्यावतीने गणवीर जन्मदिन निमित्त 25,000/-संथागार मॅरीज ब्यूरो ग्रुप वतीने संथारामला दान दिले.कार्यक्रमाचे संचालन ऍड. एकता गणवीर यांनी करून सर्वानचे आभार मानले.