सिंधुदुर्ग,दि.०८- महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेची राज्य महामंडळ कार्यकारिणी सभा कणकवली जि.सिंधुदुर्ग येथे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.मंचावर प्रमुख अतिथी म्हणून विजय भोगेकर राज्यनेते हरिश ससनकर राज्यसरचिटणीस, प्रकाश पाध्ये राज्य कार्याध्यक्ष , राज्य उपाध्यक्ष जी एस मंगनाळे,
शारदाबाई वाडकर – राज्य महिला सरचिटणीस , प्रकाश पाटील राज्य संघटक, राज्य कार्यकारी सचिव रंगराव वाडकर ,प्रमिला माने राज्य महिला उपाध्यक्ष उपस्थित होते., सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली . यावेळी सर्व राज्य व जिल्हा पदाधिकारी यांनी आढावा सादर करून शिक्षकांचे राज्य स्तरीय प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे ठराव एकमताने मांडले व शासनस्तरावर प्रश्न सोडविण्यासाठी भेट घेऊन निवेदन देण्याचे ठरले.
राज्यात महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने 50000 झाडे लावण्याचा ठराव मंजूर करण्यात आला
त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात नियोजन करून झाडांची संख्या जिल्हा कार्यकारिणी यांनी ठरवावे.यावेळी सुरेश साळवी जेष्ठ सल्लागार रत्नागिरी, गोविंद पाटील रायगड जिल्हा नेते , सचिन जाधव सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष,एस के पाटील जिल्हाध्यक्ष कोल्हापूर, किशोर आनंदवार जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, इरफान मिर्झा जिल्हाध्यक्ष वाशिम , महेंद्र हिवे जिल्हाध्यक्ष अमरावती , रत्नागिरी जिल्हाध्यक्ष यशवंत पेंढारकर संघर्ष सावरकर जिल्हाध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रकाश वाडकर, प्रदिप पवार जिल्हा सरचिटणीस रत्नागिरी,कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस तुषार पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष गंगाधर बोढे,जिल्हा उपाध्यक्ष संभाजी पाटील ,अमरावती जिल्हा उपाध्यक्ष नितीन पेढेकर ,जीवन भोयर , गजानन चिंचोळकर सुभाष अडवे,जिल्हा उपाध्यक्ष चंद्रपूर ,जिल्हा उपाध्यक्ष किरण राठोड ,जिल्हा संघटक बालाजी हाळदे , जिल्हा संघटक देवराव अमोदे गोकुळ चारथळ अचलपूर तालुकाध्यक्ष , लक्ष्मण खोब्रागडे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख चंद्रपूर, किशोर यनगंटीवार चंद्रपूर तालुका उपाध्यक्ष, लक्ष्मण सुरपाम चंद्रपुर तालुका संघटक जगदीश ठाकरे चेअरमन शिक्षक सहकारी पतसंस्था भद्रावती, बाबा रणसिंग तालुकाध्यक्ष पन्हाळा, नाथ मोरे तालुकाध्यक्ष पन्हाळा,मनोज पवार तालुका उपाध्यक्ष पन्हाळा यांच्या सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
गोंदिया जिल्ह्यात 1जुलै ते 15 जुलै दरम्यान पुरोगामी वृक्षारोपण उपक्रम प्रत्येक पदाधिकारी आपल्या शाळेत,केंद्रात व पंचायत समितीत राबवणार असल्याचे जिल्हा अध्यक्ष हरिराम येळणे, जिल्हा सरचिटणीस प्रमोद बघेले, महिला जिल्हा अध्यक्ष प्राजक्ता रणदिवे, सरचिटणीस जयश्री सिरसाटे यांनी सांगितले.