वाढदिवसाच्या शुभेच्छा
वाशिम,दि.9 जून – दारू हे एक व्यसन आहे. वारंवार दारू पिण्याची इच्छा हा मानसिक आजार आहे. दारू पिल्याने सर्व इंद्रियाची कार्यक्षमता कमी होते,रक्तवाहिन्या कुमकुवत होतात,लैंगिक क्षमता कमी होते,शुक्राणूचा नाश होतो, पचनशक्तीमध्ये बिघाड होतो,यकृत किडनी खराब होते,तसेच मधुमेह, रक्तदाब, कावीळ,इत्यादी शारीरिक आजार होतात,तसेच स्मृतिभ्रंश,मेंदूच्या रसायनात बदल,फिट्स(मिर्गी चे झटके)झोपेत बदल,उदास निराश वाटणे,घबराहट होणे,बेचैनी,कोणत्याच गोष्टीत रस व मन लागणे,भास होणे, कानात आवाज ऐकू येणे इत्यादी मानसिक आजारांची लक्षणे हे व्यसन करणाऱ्या व्यक्तीमध्ये आढळून येतात. कौटुंबिक हिंसाचार,घटस्फोट,लहान मुलांच्या मनावर विपरीत परिणाम,चोरी करणे,इतरांना पैसे मागणे,अपघात,वाद घालने,शिवीगाळ करणे,समाजात नातेवाईकात मानसन्मान न राहणे, कामावर परिणाम होणे,व्यसनावरती मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होणे, सामाजिक व आर्थिक दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात आढळून येतात. जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम जिल्हा रुग्णालय वाशिम येथे मानस व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना करण्यात आली. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्यसनाचे प्रमाण वाढले आहे त्या अनुषंगाने या कार्यक्रमाची निर्मिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल कावरखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मानस व्यसनमुक्ती केंद्राचा उद्घाटनाप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल कावरखे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अविनाश पुरी यांनी केले. कार्यक्रमाला मार्गदर्शक मानसोपचार तज्ञ डॉ.श्वेता मोरवाल उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन सामाजिक कार्यकर्ते सुनील सुर्वे, मनोविकृती ब्रदर राहुल कसादे, सामाजिक परिचारिका आरती गायकवाड व मानसशास्त्रज्ञ पवन रणवीर यांनी केले होते. संचालन राहुल कसादे यांनी केले तर आभार सुनील सुर्वे यांनी मानले. डॉ.अनिल कावरखे यांनी जिल्ह्यातील व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेऊन व्यसनातून मुक्त व्हावे व आनंदीदायी जीवन जगावे. एक चांगला नागरिक म्हणून समाजात वावरावे चांगल्या कामासाठी कधीही उशीर होत नाही दर शनिवारी जिल्हा रुग्णालय वाशिम जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत स्किल लॅब येथे दर शनिवारी सकाळी दहा वाजता व्यसनाधीन व्यक्तींनी औषधोपचार व गृपथेरीपेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.