अर्जुनी मोर. -तालुक्यातील वडेगांव/स्टे.येथील सरपंच श्रीकांत लोणारे यांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे 15 व्या वित्त आयोगा अंतर्गत 11 जुन रोजी गावक-यांना मोफत थंड पिण्याचे पाण्याचे कॅन वाटप केले आहे.
ग्रामपंचायत कार्यालय वडेगांव/स्टे.येथे आयोजीत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच श्रीकांत लोणारे होते.तर अतिथी म्हणुन उपसरपंच यशवंत रामटेके, तथा धनंजय राऊत, सौ.अर्चना नान्हे, सौ.सिमा खंडाते, कुंदा खोब्रागडे, आशाताई खुणे, मधुकर वल्के, ग्रामसेवक डि.आर.अवसरे, पराग सोनटक्के, चेतन खुणे, व ग्रामवासी प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी युवा सरपंच श्रीकांत लोणारे यांनी गावात विवीध लोकोपयोगी उपक्रम राबवून सर्व जनतेला लाभ कसा पुरविण्यात येईल.या विषयी माहिती देवुन गावाचा विकास व विविध योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत कशा पोहचतील या विषयी ग्रामवासियांना मार्गदर्शन केले.गावात ओला कचरा व सुका कचरा पेट्या लावण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे सरपंच श्रीकांत लोणारे यांनी सांगितले.