
गोंदिया,दि.१७ः- येथील ग्राहक सोसायटीच्या सभागृहात शिक्षक भारती गोंदिया जिल्हाच्यावतीने स्मृतिषेश पि.डी.चव्हाण यांच्या स्मृतिना मानवंदना देण्याकरीता श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश ब्राह्मणकर हे होते. तर प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष एड.सुशील बंसोड,गुलाब मौदेकर,महिला जिल्हाध्यक्ष ममता चूटे,मनोज नांदगाये,आ.बी.रेला, भंडारी चौधरी,माधुरी चव्हाण,नमिता हूमे,एस.यु.वंजारी, हरिराम येळणे उपस्थित होते.
शिक्षक भारतीच्या सर्व मावळ्यांनी सर्वप्रथम पि.डी.चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून,दोन मिनिटे स्तब्ध राहून आपली श्रद्धांजली वाहिली.लगेच चव्हाण यांची पत्नी, एक मुलगी आणि दोन मुलं यांना शिक्षक भारती तर्फे स्मृतीशेष पि.डी.चव्हाण शिक्षक भारती जीवन गौरव पुरस्कार स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.प्रकाश ब्राह्मणकर यांनी चव्हाण सरांनी आयुष्याच्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षक भारती करीता आणि ओबीसी बांधवांना जागृत करण्याकरीता कार्य केले.त्यांचे कार्य नेहमीच स्मरणात राहील असे भाव व्यक्त केले.एड.सुशील बंसोड यांनी आपले श्रद्धांजलीपर मत व्यक्त करताना सांगितले की जब तूम आये दुनिया मे, जग हसे तू रोये, करनी ऐसी करे, जब जाये दुनिया से, तू हसे जग रोय, असं म्हनत चव्हाण सरांनी केलेल्या कार्यांना आणि शेवटपर्यंत केलेल्या संघर्षांना उजाळा दिला. विविध ओबीसी आंदोलनातील चव्हाण सरांची भूमिका यावर प्रकाश टाकला. चव्हाण सरांचा शेवटचा शब्द जय भीम, जय ओबीसी असा होता असेही सांगितले.एस.यु.वंजारी यांनी चव्हाण यांच्या मुळेच मी ओबीसी आंदोलनात आलो,त्यांनी माझ्या जीवनात होणारा अनर्थ टाळला त्यामुळे मी त्यांचे उपकार कधीच विसरू शकत नाही अशी भावना व्यक्त केली.श्री.रेला यांनी अंधश्रद्धा निर्मूलन तसेच सामाजिक परिवर्तन यामध्ये चौहान यांनी जे योगदान दिले ते पुढील पिढीला दिशादर्शक आहेत, तरुण पिढीने त्यांच्या आदर्श घ्यावा आणि समाजकार्यात चव्हाण सरांसारखे आपणास झोकून द्यावे, असे मत व्यक्त केले.हरिराम येळणे यांनी ओबीसी आंदोलनातील चव्हाण सरांचे योगदान, तसेच त्यांच्यातील असलेल्या विविध प्रकारच्या कलागुणांना त्यांनी उजाळा दिला आणि त्यांच्या मरणोपरांत आपण 500 झाडे लावू असा निश्चय व्यक्त केला.ममता चुटे यांनी मी आज अध्यक्ष आहे ती चव्हाण सरांमुळे. त्यांनी संघटनात्मक बांधणी केली त्यामुळे आत्मविश्वास निर्माण झाला त्यामुळे मी आज या पदावर पोहोचू शकेली, ही त्यांचीच पुण्याई.माझ्यावर आजन्म राहील अशी भावना व्यक्त केली.धीरज चव्हाण यांनी माझ्या पप्पा चे कार्य हे अशा कार्यक्रमातूनच मला आज समजलेले आहेत, त्यांचे कार्य हे किती महान होते, आम्ही आजपर्यंत त्यांचे कार्य समजू शकलो नव्हतो, परंतु आता ते कार्य आम्ही हातात घेऊ हीच आमची खरी श्रद्धांजली आमच्या पप्पाला होईल. ओबीसी आंदोलनाकरीता, समस्या करीता, संघर्ष करीता आम्ही नेहमीच पुढे राहू अशी भावना व्यक्त केली.
आचल चव्हाण हिने माझे पप्पा नेहमी म्हणायचे की विद्यार्थ्यांनी फक्त एकाच फील्डमध्ये न जाता वेगवेगळ्या फील्डमध्ये जावे, जेणेकरून आपले एससी, एसटी, ओबीसी चे लोक प्रशासनिक अधिकारी बनू शकतील त्यांचे स्वप्न मी पूर्ण करेन असा आशावाद व्यक्त केला.यावेळी अनेक व्यक्तींनी आपले मोलाचे मत व्यक्त करून परिवर्तनवादी चळवळ कशी चव्हाण सरांनी पुढे नेली व आपण आता ती कशी चालवायची याबद्दल विचार व्यक्त केले.आणि शिक्षक भारतीनी हा कार्यक्रम आयोजित केला याबद्दल स्मृतिशेष पि.डी.चव्हाण यांच्या पत्नी माधुरीताई चव्हाण यांनी संघटनेचे आभार मानले.
कार्यक्रमाचे संचालन रमेश सोनवणे यांनी केले तर या कार्यक्रमात मोठ्या संख्येने गोंदिया जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाला रामभगत पाचे,पवन भगत,मनोहर कटरे,पी.पी. बिसेन,डोलारे सर,जगदेव ऊके,बघेले,उत्क्रांत उके,अनिता पटले,लक्ष्मी बोपचे,बनकर,लील्हारे मॅडम, आशिष वंजारी,राजकुमार मात्रे, एन.के.शेंडे,राजू टेंभरे आदी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.शेवटी सर्वांचे आभार भंडारी चौधरी यांनी मानले .





