
गोंदिया,दि.२७ः- गोंदिया नगर परिषद क्षेत्रातंर्गत येत असलेल्या तिरोडा-गोंदिया रिंगरोडवरील बोपचे पेट्रोलपंप समोरील नाल्याच्या काठावर मलमामाती घालून तसेच सिमेंट क्रांकीटचे काॅलम उभे करुन अतिक्रमण करण्यात आल्याने नाल्याचे पात्र अरुंद झाल्याने पावसाळ्यात पुरपरिस्थितीच्यावेळी समस्या निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे या नाल्यावर अज्ञात व्यक्तीने केलेले अतिक्रमण तातडीने हटवून नालामुक्त करण्यात यावे,तसेच नाल्यात साचलेली घाण स्वच्छ करण्यात यावे यासंदर्भातील तक्रार माजी नगरसेवक जितेंद्र(बंटी) पचबुध्दे यांनी नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे ८ मे २०२४ रोजीच्या तक्रारीवर पाहणी करुनही कुठलीच कारवाई न करण्यात आल्याने नगरपरिषद बांधकाम विभागातील अधिकार्यांची भूमिका संशय़ास्पद ठरु लागली असून पावसाळ्यात या नाल्यामुळे पुरस्थिती निर्माण होऊन काही नुकसान झाल्यास नगरपरिषद व बांधकाम विभागाचे अधिकारी दोषी राहणार असे पंचबुधद्े यानी म्हटले आहे.