30.5 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ मदतनिस भरती प्रक्रियेत प्रलोभनाला बळी पडू नका-महिला बालकल्याण सभापती सविता पुराम

मदतनिस भरती प्रक्रियेत प्रलोभनाला बळी पडू नका-महिला बालकल्याण सभापती सविता पुराम

0
779

blank

गोंदिया,दि.१८-जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागांतर्गत येत असलेल्या जिल्ह्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयांतर्गत ग्रामिण भागात असलेल्या अंगणवाडी मदतनिसांच्या रिक्त पदाची भरती प्रकिया सुरु झालेली आहे.२४४ पदाकरिता भरती प्रक्रिया सुरु असून भरती प्रकियेत कुणाच्याही कुठल्याही आमिष व प्रलोभनाला बळी पडू नये असे आवाहन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांनी पत्रकाद्वारे केले आहे. सदर भरती प्रक्रिया ही महिला व बालविकास विभागातील शासन निर्णय क्रमांक (१) एबावि-२०२२/प्र.क्र.९४/का.६ दिनांक ०२ फेब्रुवारी २०२३ व (२) महिला व बालविकास विभागातील शासन निर्णय क्रमांक एबावि-२०२२/प्र.क्र.९४/का.६ दिनांक ११ ऑगस्ट २०२३ मध्ये नमुद केलेल्या अटी व शर्ती प्रमाणे भरती प्रक्रिया घेण्यात येईल. या भरती प्रक्रिये मध्ये पारदर्शीतेचे काटेकोर पणे पालन करण्यात येत आहे.सदर भरती प्रक्रियेत थेट नियुक्ती करण्यात येणार असुन कोणत्याही प्रकारची मुलाखत न घेता गुणानुक्रमा नुसार अंतीम निवड यादी लावून पात्र उमेदवाराची निवड होणार असल्याचे म्हटले आहे.त्यामुळे सदर भरती प्रकियेत कोणत्याही प्रकारच्या आमिष किंवा प्रलोभनास बळी पडु नये असे श्रीमती पुराम यांनी म्हटले आहे.

blank