
भंडारा,दि.१९ः महाराष्ट्रामध्ये कमी कालावधीमध्ये नवालौकिक आलेली अभ्यासू व तरुण शिक्षकांचे संघटना म्हणून शिक्षक सहकार संघटनेची भंडाऱ्यामध्ये उद्या दिनांक 20 जुलै 2024 ला शासकीय विश्रामगृहामध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे,या बैठकीमध्ये भंडारा जिल्हा कार्यकारणी गठीत होणार असल्याने जिल्ह्यातील शिक्षक बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रवी अंबुले यांनी केले आहे.
ऑनलाइन आंतरजिल्हा बदली, ऑनलाइन जिल्हा अंतर्गत बदली, शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न, शिक्षण सेवकांचे मानधन वाढीचा प्रश्न, सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व बूट मिळण्याचा प्रश्न तसेच अनेक शिक्षक व विद्यार्थी हिताचे प्रश्न सोडवणारी संघटना म्हणजे शिक्षक सहकार संघटनेच्या प्रमुख्याने नाव घेतलं जातं. त्यामुळे जिल्हा परिषद भंडारा येथे कार्यरत अनेक शिक्षकांनी शिक्षक सहकार संघटनेचे कार्यकारणी गठित करण्याचा मानस व्यक्त केला. संघटनेत काम करणाऱ्या शिक्षकांची बैठक घेऊन कार्यकारणी गठीत होणार आहे.सदर सभेचे आयोजन शिक्षक सहकार संघटनेचे विभागीय अध्यक्ष रवींद्रकुमार अंबुले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे
तरी जिल्हा परिषद गोंदिया येथे कार्यरत असणाऱ्या शिक्षकांनी सदर सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन अरविंद त्रिपुडे, सुरेंद्र ठाकरे, उमेश गोंडाने, अनिल पटले, किरण चव्हाण, व इतर शिक्षकांनी केलेले आहे.