गोंदिया,दि.०४-: जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे विज सेवकाला बडतर्पेâ करण्यात आले. या कारवाईला घेवून कामगार न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाचे आदेशाला स्थगिती दिली.व विजसेवकाला कामावर घेण्याच्या सुचना केल्यात. परंतु, महावितरणने सेवेत घेताना जानेवारी-२०२४ पासून नियुक्ती दिली. यामुळे पिडित विजसेवक ५ वर्षाचे वेतन व इतर लाभापासून मुकले. या अन्यायाला घेवून वर्कस फेडरेशनच्या नेतृत्वात साखळी आंदोलनाला सुरूवात करण्यात आली. आंदोलनाच्या आठव्या दिवशी आंदोलनाला यश आले असून अधिकार्यांनी मागण्या मान्य केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
महावितरण गोंदिया परिमंडळतंर्गत कार्यरत विजसेवक प्रविण रावतेल हा अनुकंपा तत्वावर एसटी प्रवर्गातून सेवेत रूजू झाला. मध्यप्रदेश राज्यातील रहिवासी असल्याने जात वैधता प्रमाणपत्र सादर करू शकला नाही. यामुळे सन २०१७ मध्ये खुल्या प्रवर्गात समावेश करण्याकरीता अर्ज केला होता. पण खुल्या प्रवर्गात समावेश न करता जात वैधता प्रमाणपत्र न दिल्यामुळे ७ दिवसांची बडतर्फ करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. त्यावर एमएसई वर्कर्स फेडरेशन गोंदियाच्या माध्यमातून कामगार न्यायालयात जाऊन बडतर्फ आदेशाला स्थगिती मिळवली. व २०१८ पासून ११ वेळा आंदोलन करुन डिसेंबर २०२३ ला मुख्य अभियंता गोंदिया यांच्या दालनात चर्चा होऊन नियमित करण्याचे ठरले. कामगार न्यायालयातून नियमित आदेश मिळताच प्रकरण परत घेण्याचे सुध्दा ठरले. परंतु, महावितरणकडून तंत्रज्ञ पदावर महावितरणकडून जानेवारी २०२४ पासून नियुक्ती देण्यात आली.
यामुळे पिडीतावर अन्याय झाला आणि ५ वर्षाचे वेतन व इतर लाभापासून मुकण्याची वेळ आली. हा अन्याय लक्षात घेत एमएसई वर्कर्स फेडरेशनच्या माध्यमातून वरिष्ठ स्तरावर पत्र व्यवहार सुरू करण्यात आला. पण प्रशासन काहीच ऐकत नसल्याने शेवटी नाईलाजाने झोन सचिवांनी दिलेल्या आंदोलनाच्या नोटीसनुसार २६ जुलै २०२४ पासून वर्कस फेडरेशनच्या नेतृत्वात साखळी आंदोलनाला सुरूवात करण्यात आली. या दरम्यान अधिकार्यांशी वाटाघाटी म्हणून ४ वेळा चर्चा करण्यात आल्या. शेवटी २ ऑगस्टच्या चर्चेत कार्यकारी अभियंता आनंद जैन यांच्या दालनात पुर्वलक्ष प्रभावाने म्हणजेच माहे जून- २०१९ पासून सर्व लाभासह तंत्रज्ञ या पदावर नियमित आदेश देण्याचे मान्य करण्यात आले. यामुळे मागील आठ दिवसांपासून सुरू असलेले साखळी आंदोलन वर्कस फेडरेशनने मागे घेतले.
या आंदोलनामुळे प्रविण रावतेल यांना न्याय मिळाला असून प्रलंबित असलेला पगार व इतर लाभ त्यांना मिळणार आहे. या आंदोलनात वर्कर्स फेडरेशनचे विवेक काकडे, विजय चौधरी, सुरेश पेठे, विनोद चौरागडे, ईश्वर गोखले, अभिषेक ठाकूर, चंद्रप्रकाश चिंधालोरे, अशोक ठवकर, मंगेश माडीवाले, दीपक नागमोते, सतीश उईके, जगदीश सेंगर, सचिन पटले, रवी भस्के, बेनेश कटरे, योगेश फरकुंडे, चंद्रशेखर वाघ, रोहित रामटेके, निलम मेश्राम, शंकर झगेकार, चंद्रहास पारधी, सुमेध वैद्य, गणेश सहारे, दीपक बुधे, सुशांत बंडावार, प्रविण रावतेल, ओमेश्वरी रांहागंडाले, लुकेश्वरी टेंभरे, योगिता लोणगाडगे, मंगला चुटे, संगीता दाभाडे यांनी परिश्रम घेतले.