कायदेविषयक जनजागृती साक्षरता शिबीर

0
39

गोंदिया, दि.5 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ गोंदिया यांच्या विद्यमाने 29 जुलै 2024 रोजी ‘मानसिक आजारी आणि मानसिकदृष्ट्यता अक्षम व्यक्तींना कायदेशीर सेवा योजना 2016’ निमीत्त स्वीकार स्पेशल एज्युकेशन सेंटर फॉर एम.आर.चिल्ड्रन निवासी स्कुल, गोंदिया येथे कायदेविषयक जनजागृती साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एन.के.वाळके, ॲड. सुजाता तिवारी, मिलिंद बांबोडे, ॲड. नरेश शेन्डे, ॲड. हरिणखेडे उपस्थित होते.

         मिलिंद बांबोडे यांनी सांगितले की, स्वीकार स्पेशल एज्युकेशन सेंटर फॉर एम.आर. चिल्ड्रन निवासी स्कुल गोंदिया ही शाळा सन 2000 पासून कार्यरत असून 75 विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. सुजाता तिवारी यांनी मानसिक अवसादाचे उपचार, कायदेशीर अधिकार व मानसिक स्वास्थ काळजी अधिनियम 2017 बाबत माहिती दिली व आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मानसिक रोगी यांना पाच लाख अनुदान मिळतो असे सांगितले. एन.के.वाळके यांनी मानसिक रुग्णांना मिळणारे फायदे व सोयी सवलती याबद्दल माहिती दिली व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया मानसिक आजारी आणि मानसिकदृष्ट्यता अक्षम व्यक्तींना मोफत उपचार सेवा देण्याकरीता मदत करणार असे सांगितले.

         कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया येथील कर्मचारी पी.बी.अनकर, ए.एम.गजापुरे, एस.एम.कठाणे, पी.एन.गजभिये, एस.डी.गेडाम, पी.डी.जेंगठे, के.एस.चौरे, एल.ए.दर्वे, आलेशान मेश्राम, बी.डब्ल्यु.पारधी, आर.ए.मेंढे, सरतिमा भगत यांनी मोलाचे सहकार्य केले.