तिरोडा,दि.०८-अदानी फाउंडेशन तिरोडाच्या सामुदायिक आरोग्य या कार्यक्रमांतर्गत मागील वर्षापासून तर आजपर्यंत तिरोडा तालुक्यातील एकूण 42 हजार 193 नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मयंक दोशी, अदानी पावर प्रमुख तिरोडा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला.
यामध्ये अदानी फाउंडेशन द्वारा चालविल्या जाणाऱ्या मोबाईल हेल्थकेअर युनिट च्या माध्यमातून तालुक्यातील 25 गावांमधील 36454 बालके, स्त्री ,पुरुष ,वृद्ध यांना मोफत तपासणी करून मोफत औषध सेवा देण्यात आली.
तर जनरल हेल्थ चेक अप कॅम्पच्या माध्यमातून एकूण 1652 रुग्णांना मोफत सेवा देण्यात आली.
यासोबतच अदानी फाउंडेशन तिरोडा द्वारा मल्टीस्पेशालिटी आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन तालुक्यातील 12 गावांमध्ये केले होते या शिबिरामध्ये सामान्य रुग्ण तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ ,स्त्री रोग तज्ञ यासारख्या तज्ञ डॉक्टरांद्वारे 3776 रुग्णांची तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले.
तसेच राष्ट्रसंत तुकडोजी रीजनल कॅन्सर हॉस्पिटल नागपूर व अदानी फाउंडेशन तिरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने गुमाधावडा, भिवापूर, एकोडी, दांडेगाव या चार गावांमध्ये मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा लाभ 311 रुग्णांनी घेऊन कर्करोगाचे प्राथमिक लक्षण आढळून आलेल्या रुग्णांना पुढील उपचाराकरिता राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटल नागपूर येथे पाठविण्यात आले.
यावर्षी 2024 मध्ये सुद्धा अदानी फाउंडेशन तिरोडा च्या माध्यमातून आरोग्य सेवेचे विविध उपक्रम राबवून जास्तीत जास्त नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी अदानी फाउंडेशन प्रयत्न करेल असे अदानी फाउंडेशन प्रमुख बिमुल पटेल यांनी सांगितले.या सर्व उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अदानी फाउंडेशन चे कार्यक्रम अधिकारी स्वप्निल वाहने व व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले