शाहू भगत यांचा उत्कृष्ट जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून गौरव

0
17
विशेष पुरस्काराने सन्मानित; उत्कृष्ट कार्याची दखल
उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्याहस्ते सन्मानपत्र देऊन कौतुक
वाशिम दि.१५ ऑगस्ट – कारंजा तालुक्यातील औरंगपूर या अगदी छोट्याशा गावातील रहिवासी असलेले जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू पुरूषोत्तम भगत यांचा आज दि.१५ ऑगस्ट रोजी उत्कृष्ट जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून गौरव करण्यात आला. संचालक,आपत्ती व्यवस्थापन मदत पुनर्वसन विभाग मंत्रालय,मुंबई यांच्याकडून त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांना उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्यमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, विभागीय आयुक्त डॉ.निधी पाण्डेय यांच्याहस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
    यावेळी आमदार रवी राणा, विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, पोलीस अधीक्षक ग्रामीण विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त संजय पवार, उपायुक्त गजेंद्र बावणे, सहायक आयुक्त भूसुधार श्यामकांत मस्के, सहायक आयुक्त वैशाली पाथरे आदी मान्यवर उपस्थित होते.
     शाहू भगत हे मागील चार वर्षापासून जिल्ह्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून कार्यरत आहे.जिल्ह्यात पूर परिस्थिती असो, किंवा आपत्कालीन परिस्थिती या परिस्थितीवर मात करण्यासाठी सदैव तत्पर असतात.सामाजिक कार्यात देखील ते अग्रेसर असतात. त्यांच्या या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन महसूल प्रशासनाअंतर्गत महाराष्ट्र शासनाचा महसूल व वनविभागाचा उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विशेष पुरस्काराने त्यांना उत्कृष्ट जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून गौरविण्यात आले.श्री.भगत यांचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.