गोंदिया,दि.१७ः-जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे गोंदिया तालुका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.वेदप्रकाश चौरागडे यांनी जिल्हा क्षयरोग विभागाचे प्रभारी अधिकारी म्हणून काम करतांना राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाची यशस्वी अमलंबजावणी करुन उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.डाॅ.चौरागडे यांचा सत्कार स्वातंत्र्यदिनी करण्यात आले.डाॅ.चौरागडे यांनी जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे आभार मानले आहेत.चौरागडे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.