नगरसेवक साखरेकडून दीपस्तंभ वाचनालयाला स्पर्धा परीक्षेचे पुस्तके भेट

0
32

अर्जुनी मोर-तालुक्यातील -भरनोली येथे दीपस्तंभ वाचनालय आहे. या वाचनालयामध्ये परिसरातील राजोली, भरनोली, कन्हाळ गाव, तळेगाव, खडकी, बामणी,ईळदा, आजूबाजूचे गावचे अनेक विध्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात. या वाचनालयाच्या माध्यमातून अति संवेदनशील व जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गावातून अनेक विद्यार्थी वाचनालय मध्ये ज्ञानार्जनासाठी येत असतात.दीपस्तंभ वाचनालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील  आतापर्यंत 20 ते 25 विद्यार्थ्यांना नोकरी मिळवलेली आहे.दीपस्तंभ वाचनालय ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचे आयुष्य उज्वल करण्यासाठी एक दीपा प्रमाणे काम करीत आहे. अर्जुनी/ मोरगावचे नगरसेवक दानेश साखरे यांनी दोन महिन्यापूर्वी या वाचनालयाला भेट दिली होती.तेथील विद्यार्थी व मार्गदर्शक तलाठी शेख यांनी स्पर्धा परीक्षेचे पुस्तक उपलब्ध करून देण्याची मागणी केलेली होती. त्यामुळे नगरसेवक साखरे यांनी वाचनालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षचे पुस्तके भेट दिली. यावेळी अनिल लाडे,तुषार बडोले,उच्च पशुवैदेकीय अधिकारी,तलाठी नावेद शेख,आर.के. जांभुळकर,कुंदन गहाणे, कोमेश ताराम आणि विद्यार्थी उपस्थित होते.