देसाईगंज दि २७- देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथील कारमेल अकॅडमी मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी कार्यक्रम
मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये पालकांसाठी मॉ – कन्हैया नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पालकांनी मोठ्या उत्साहात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला होता. या प्रसंगी आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार कृष्णा गजबे यांच्या पत्नी सौ विद्या गजबे यांनी उपस्थिती दर्शविली. या स्पर्धेत प्रथम् प्रथम आराध्या मंडल, सिया बैलमार द्वितीय आणि माहिरा इन्वाते यांनी तिसरा क्रमांक पटकाविला.या कार्यक्रमास कारमेल ऑकाडमीचे मुख्याध्यापक फादर जिनेश मॅथ्यू, उपमुख्याध्यापिका सिस्टर लिटी, विभाग प्रमुख ऋतुजा देवसकर, पूनम पूरी, शाफीया शेख, रिना मुजनकर, मोना आकोटकर यांनी अथक परिश्रम घेतले.