हिंगोली जिल्ह्यातील तलाठ्याच्या हत्येचा गोंदियात महसुल संघटनेने नोंदवला निषेध

0
122
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 40;

गोंदिया दि.२९: हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगाव (रंजे.) येथील तलाठी कार्यालयात शेतीविषयक कागदपत्रासाठी आलेल्या एकाने तलाठ्याच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून चाकूने भोसकल्याची खळबळजनक घटना बुधवारी (दि.२८) दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. जखमी तलाठ्याचा परभणी येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.

संतोष देवराव पवार (३६, रा. वाढोणा, ता. सेनगाव) असे हत्या झालेल्या तलाठ्याचे नाव आहे. या घटनेचा गोंदिया जिल्ह्यात महसुल संघटनेने निषेध नोंदवला.गोंदियाच्या प्रशासकिय इमारत परिसरात तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेचे अध्यक्ष तहसिलदार समशेर पठाण ,विदर्भ पटवारी संघ शाखा गोंदियाचे उपाध्यक्ष एम़.आऱ़.पांडे,सचिव डी.आर.भोयर,उपविभाग अध्यक्ष योगेश मेश्राम,सचिव अमित बडोले, मंडळ अधिकारी संघटना अध्यक्ष प्रकाश तिवारी,सचिव जी.बी.गाढवे,उपाध्यक्ष राजू बोरकर,हस्तरेखा बोरकर,कर्मचारी संघटनेचे राजेश मेमन यांच्यासह नायब तहसिलदार,मंडळ अधिकारी व तलाठी यांनी सभा घेत घटनेचा काळ्या फिती लावत निषेध नोंदवला.तसेच संभाजीनगर येथील मृत तलाठ्यास श्रध्दाजंली वाहिली.

हिंगोली जिल्ह्यातील *आडगाव रंजे येथील तलाठ्याच्या हत्येचा गोंदियात महसुल संघटनेने नोंदवला* निषेध

बुधवारी दुपारी आडगाव (रंजे.) येथील तलाठी सज्जा कार्यालयात नेहमीप्रमाणे कामकाज करत होते. त्यांच्याकडे बोरी सावंत सज्जाचा अतिरिक्त पदभार असल्याने त्या ठिकाणचा एकजण शेतीविषयक कामकाजासंदर्भात तिथे आला. या ठिकाणी दोघांमध्ये वाद होऊन बाचाबाची झाली. त्याने तलाठी संतोष पवार यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून चाकूने भोसकले. ग्रामस्थांनी जखमी पवार यांना परभणी येथे उपचारासाठी हलविले. परंतु, डाॅक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले.