छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळाचे निकृष्ठ दर्जाचे काम करण्याऱ्या दोषींवर कार्यवाही करा

0
54

गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची(अजित गट) मागणी

गोंदिया,दि.२९ः जिल्हा राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीच्या वतीने गोंदिया शहारातील मनोहर चौक स्थित छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून सिंधुदुर्ग मालवण येथील घटनेचा मुक मोर्चा काढून निषेध करण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजकोट किल्ल्यावरील युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळाचे निकृष्ठ दर्जाचे काम करण्याऱ्या दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर मागील वर्षी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा काही दिवसापूर्वी दुर्घटनाग्रस्त झाला हा महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का असून ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या पुतळाची उभारणी करतांना अक्षम्य त्रुटी झाल्याचे नाकारता येत नाही. याप्रकरणी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळाचे निकृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्यांवर अत्यंत कठोर कार्यवाही करण्यात यावी. तसेच राजकोट किल्ल्यावर युगपुरुष व भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, दैदिप्यमान शौर्याचा इतिहास सांगणारे स्मारक आणि शक्तिशाली पुतळा पुन्हा उभारण्यात यावा अशी मागणी गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली.

यावेळी प्रेमकुमार रहांगडाले, विनोद हरिनखेड़े, नानू मुदलियार, केतन तुरकर, माधुरी नासरे, विशाल शेंडे, राजु एन जैन, अखिलेश सेठ, योगेंद्र भगत, प्रेम जैसवाल, सतीश देशमुख, विनीत सहारे, सुनील भालेराव, अशोक सहारे, किरण पारधी, रवि पटले, नीरज उपवंशी,आशा पाटिल, कुंदा पंचबुधे, मालती कापसे,खालिद पाठन, विनायक खैरे, जिम्मी गुप्ता, लखन बहेलिया, रमन ऊके, कल्लू मस्करे, संगीता माटे, रुचिता चौहान, पुस्तकला माने, वर्षा बैस, वर्षा बढ़गुजर, मोनिका सोनवाने, करण टेकाम, झनकलाल ढेकवार, विजय रहांगडाले, गोविंद लीचडे, हितेश पतेह, पंकज चौधरी, विनोद कोहपरकर, सौरभ जैस्वाल, प्रशान्त सोनपुरे, कपिल बावन्थड़े, सुनील पटले, शैलेश वासनिक, कृष्णकुमार जैस्वाल, नागों बंसोड़, आर डी अग्रवाल, राजु येडे, कान्हा बघेले, अनुज जैसवाल, राज शुक्ला, भागेश बिजेवार, दर्पण वानखेडे, शरभ मिश्रा, श्रेयष खोबरागड़े, अविनाश महावत, कुणाल बावनथड़े, वामन गेडाम, नरेंद्र बेलगे व आरिफ पठाण सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.