वाढीव वीज दर कमी करा, वीज कंपनीच्या विरोधात शिवसेनेने काढली शव यात्रा

0
49
वाढदिवसाच्या शुभेच्छा

कार्यकारी अभियंत्या मार्फत उर्जामंत्री देवेंद्र फडणवीसला पाठविले निवेदन
गोंदिया : महावितरण कंपनी द्वारे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये विद्युत दर मनमर्जीने वाढवून आम जनतेकढून जोर जबरदस्तीने वसुली करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वास्त जास्त वीज निर्मिती बाकी राज्यांच्या तुलनेत होत असूनही सर्वात महाग वीज दर महाराष्ट्र राज्या मध्ये आहे. या शिवाय आम जनतेवर मीटर चार्ज, मासिक किराया, मेंटेनन्स चार्ज, अधिभार जोडल्या जात आहे. बाकी राज्यामध्ये वीज दर फार कमी आहे. तसेच 0 ते 200 युनिटपर्यंत वीज दर अनेक राज्यामध्ये वीज दर माफ करण्यात आलेले आहे. त्याच प्रमाणे महाराष्ट्रमध्ये हि 200 युनिटपर्यंत माफ करण्यात यावे आणि 30 प्रतिशत वीज दर वाढवण्यात आले आहे त्याला हि निरस्त करण्यात यावे. त्यामुळे महाराष्ट्राचे गोर गरीब जनतेवर वाढीव वीज दरामुळे होत असलेला त्रास कमी होईल. त्याच प्रमाणे वाढीव वीजदर लवकरात लवकर कमी करण्यात यावे, अन्यथा शिवसेनेला महावितरण कंपनीच्या विरुद्ध आंदोलांत्मक भूमिका घेउन रस्त्यावर उतरावे लागेल याची पूर्ण जिम्मेदारी आपली राहील यांची नोंद घ्यावी. दरम्यान 29 अगस्त रोजी यादव चौक स्थित शिवसेना (उबाठा) कार्यालयातून शव यात्रा काढून महावितरण कंपनी, गोंदियाचे कार्यकारी अभियंता मार्फत उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख पंकज एस. यादव, जिल्हा प्रमुख शैलेश जायस्वाल, युवासेना जिलाध्यक्ष हरीश तुळसकर, शहर प्रमुख राजेश कनोजिया व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.