पोलिस दादालोरा खिडकी योजनेतून तुमडीकसा शाळेचा कायापालट

0
136

देवरी, दि.१- छत्तीसगड सीमेवर असलेले अतिदुर्गम नक्षलगग्रस्त अशी ओळख असलेले आणि अनेक पिढ्यांचे दारिद्र्य आणि शिक्षणाचा अभाव असलेले देवरी तालुक्यातील तुमडीकसा हे गाव. विकासापासून कोसोदूर असलेल्या या गावातील प्राथमिक शाळेचा पोलिस दादालोरा खिडकी योजनेतून पोलिस विभागाच्या वतीने कायापालट करण्यात आला. काल शनिवारी (दि.३१) या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचा वाटप कॅम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंदियाचे पोलिस अधीक्षक गोरख भामरे हे होते. यावेळी गोंदियाचे अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा. उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी चिचगड पोलिस ठाणेचे ठाणेदार तुषार काळेल, नागपूरचे माऊली सेवा संघ, रोटरी क्लबचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते.

 मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियाना अंतर्गत चिचगड पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या तुमडीकसा येथील प्राथमिक शाळेच्या जीर्ण झालेल्या इमारतीचा कायापालट गोंदिया पोलिस दलाच्या कम्युनिटी पोलिसींगच्या माध्यमातून करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, विविध प्रकारची खेळणी, सेंद्रिय खत बनविण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची कीट आणइ अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांना लागणाऱ्या साहित्याच्या कीटचे वाटप करण्यात आले. यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुलले होते. आपल्या मार्गदर्शनातून तुमडीकसा सारखी आणखी काही गावातूल जीर्ण झालेल्या शालेय इमारतींचे जीर्णोद्दार करणाचे मानस असल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले.

 ‘तुमडीकसा ‘ येथे गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे जीर्ण अवस्थेत असलेल्या जिल्हा परिषद शाळा “दत्तक” घेऊन शाळेचा कायापालट करून नक्सल ग्रस्त आदिवासी भागातील नागरिकांमध्ये पोलीस विभागा बद्दल सहानभूती निर्माण केल्याबद्दल गावकऱ्यांनी पोलिस दलाचे कौतुक केले. दुर्गम भागातील शाळा ही आजच्या इतर कॉन्व्हेंट शाळेच्या युगात कोठेही मागे राहणार नाहीत या उद्देश्याने शाळेमध्ये इतर सोईसुविधा पुरवून लहान मुलामुलींना पुरवून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे कामी व जीर्ण झालेल्या शाळा दत्तक घेऊन त्यांचा कायापाट करून ग्रामीण भागातील शाळा मध्ये जनजागृती करण्याचे कार्य पोलिस विभागाकडून पुढे ही सुरू राहील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.

या प्रसंगी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उपस्थितांचे ठाणेदार तुषार काळेल यांनी आभार मानले.