गोंंदिया जिल्हा मुख्यालयात सेतू केंद्राची सेवा बंद; नागरिक, विद्यार्थ्यांना होतोय त्रास

0
124

खासगी केंद्र चालकांची मनमानी,आधार पत्ता बदलाकरीता आमदाराच्या पत्राचाच आग्रह,इलेक्ट्रिक बिलला नकार

सर्वर डाऊनमुळे गेल्या १ महिन्यापासून आधारमध्ये पत्ता बद्दल करणे बंद,नागरिकांत असंतोष

गोंदिया : येथील जिल्हाधिकारी कार्यालय,पंंचायत समिती, तहसील कार्यालयात सेतू केंद्राची (Setu Center) सेवा बंद असल्याने विद्यार्थी व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मागील 15 दिवसांपासून नागरिकांना सर्व्हर डाऊनचा (Server Down) फटका सहन करावा लागत आहे.त्यामुळे आधार कार्डवर पत्ता बदल करण्याकरीता सर्वसामान्य नागरिकांना हेलपाटे खाण्याची वेळ आली आहे.विशेष म्हणजे आधार कार्डवर पत्ता बदल करण्याकरीता ज्या कागदपत्रांची गरज आहे,त्यामध्ये इलेक्ट्रिक बिल हे ७ व्या क्रमांकावर असताना काही खासगी केंद्रचालक इलेक्ट्रिक बिल घेण्यास स्पष्ट नकारत देत आमदाराचेच पत्र हवे असा आग्रह धरत आहेत.विशेष म्हणजे आमदार खासदारांचे पत्र हे यादीत खूप खालच्या स्थानावर असताना नागरिकांना त्रास देण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

सेतू केंद्र बंद असल्याने विविध प्रमाणपत्रासाठी येणाऱ्या विद्यार्थी व पालकांना मनस्ताप सहन करावे लागत आहे. गोंदिया तालुका सर्वात मोठा तालूका आहे. या भागातील ऑनलाइन प्रक्रिया नेहमीच खंडित होत असते. मागील अनेक दिवसांपासून कधी सर्वर डाऊन, कधी नेटची समस्या, तर कधी कृत्रिम समस्येमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आता शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली असून, महविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.त्यातच अनेकांना पत्ता बदल करण्याकरीता केंंद्राचे चकरा मारण्याची वेळ आली आहे.

प्रवेशासाठी सेवाकेंद्र

जातीचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेयर, अधिवास, शपथपत्र या प्रमापत्राची प्रवेशासाठी आवश्यता आहे. मात्र, सेतू केंद्रातील सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे प्रमाणपत्र वेळवर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडत आहेत. विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालय,पंचायत समिती व तहसील कार्यालयाच्या चकरा मारत आहेत.

विद्यार्थ्यांना मोठा मन:स्ताप

सद्यस्थितीत शेतीचा हंगाम सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच पालकांनाही मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. सेतूच्या प्रवेशद्वारावर सहर डाऊनचा फलक लागून असल्याने विद्यार्थी व पालकवर्गासमोर प्रमाणपत्र मिळविण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.

आधार कार्ड पत्ता बदलणाऱ्या कागदपत्रांची यादी 

आधार कार्ड पत्ता बदलण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) च्या अधिकृत वेबसाइटवर स्पष्टपणे सूचीबद्ध आहेत. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने स्वीकारलेल्या आधार कार्ड पत्ता बदलणाऱ्या कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे आहे –

  • पासपोर्ट
  • शिधापत्रिका
  • मतदार ओळखपत्र
  • बँक पासबुक/स्टेटमेंट
  • वाहन चालविण्याचा परवाना
  • पोस्ट ऑफिस अकाउंट पासबुक/स्टेटमेंट
  • नवीनतम वीज बिल
  • PSU द्वारे जारी केलेले सरकारी फोटो ओळखपत्र किंवा फोटो ओळखपत्र
  • नवीनतम पाणी बिल
  • नवीनतम टेलिफोन लँडलाइन बिल
  • नवीनतम क्रेडिट कार्ड स्टेटमेंट
  • मालमत्ता कर पावती (1 वर्षापेक्षा जुनी नाही)
  • विमा पॉलिसी दस्तऐवज
  • फोटो आणि पत्ता असलेले बँकेने जारी केलेले पत्र (लेटरहेडवर स्वाक्षरी केलेले आणि सीलबंद). 
  • लेटरहेडवर मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेने जारी केलेले फोटो असलेले स्वाक्षरी केलेले पत्र
  • लेटरहेडवर नोंदणीकृत कंपनीने जारी केलेले फोटो असलेले स्वाक्षरी केलेले पत्र
  • पेन्शनर कार्ड
  • शस्त्र परवाना
  • NREGS जॉब कार्ड
  • किसान पासबुक
  • स्वातंत्र्य सैनिक कार्ड
  • CGHS/ECHS कार्ड
  • गाव पंचायत प्रमुखाने दिलेले पत्त्याचे प्रमाणपत्र 
  • UIDAI च्या मानक नमुन्यात आमदार किंवा खासदार किंवा MLC किंवा कोणत्याही राजपत्रित अधिकाऱ्याने जारी केलेला फोटो असलेले पत्त्याचे प्रमाणपत्र
  • वाहन नोंदणी प्रमाणपत्र
  • आयकर मूल्यांकन ऑर्डर
  • नोंदणीकृत भाडे करार/विक्री करार/लीज करार
  • राज्य शासनाने फोटोसह दिलेले जात व अधिवास प्रमाणपत्र
  • टपाल खात्याने फोटोसह जारी केलेले पत्ता कार्ड
  • नवीनतम गॅस कनेक्शन बिल
  • सरकारी प्रशासनाद्वारे जारी केलेले अपंगत्व ओळखपत्र किंवा अपंग वैद्यकीय प्रमाणपत्र
  • जोडीदार/पालकांचा पासपोर्ट
  • पत्त्यासह सरकारने जारी केलेले विवाह प्रमाणपत्र
  • भामाशाह कार्ड
  • सरकारने जारी केलेले निवासाचे नवीनतम वाटप पत्र
  • मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांद्वारे जारी केलेले ओळखपत्र
  • शाळेचे ओळखपत्र
  • नाव आणि पत्ता असलेले शाळा सोडल्याचा दाखला
  • UIDAI च्या मानक स्वरूपावर अधिक्षक / मॅट्रॉन / / वॉर्डन / मान्यताप्राप्त निवारागृहे किंवा अनाथाश्रमांचे संस्था प्रमुख यांचेकडून प्रमाणपत्र.

आधार पत्ता बदलण्यासाठी फी लागू आणि टर्नअराउंड वेळ

मुळात, आधार रेकॉर्डमध्ये पत्ता बदलण्याच्या अपडेटवर शुल्क आकारले जाते. तथापि, जर तुम्ही आधार नावनोंदणी केंद्रावर आधार पत्ता बदल अपडेट करण्याची विनंती केली, तर तुम्हाला प्रत्येक वेळी 25 रुपये भरावे लागतील. तुमची अपडेट विनंती प्राप्त झाल्यानंतर, UIDAI च्या वेबसाइटनुसार अपडेट 90 दिवसांच्या कालावधीत यशस्वीरित्या केले जावे. अपडेट यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर, तुम्हाला एक पुष्टीकरण संदेश प्राप्त होईल. त्यानंतर तुम्ही UIDAI च्या वेबसाइटवरून ई-आधार कार्ड ऑनलाइन डाउनलोड करू शकता. तुमच्या बदललेल्या पोस्टल पत्त्यावर आधार पत्र देखील वितरित केले जाईल.