ज्येष्ठ नागरिक समाजाचे मार्गदर्शक – माजी आमदार राजेंद्र जैन

0
57
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया,दि.०६- ज्येष्ठ नागरिक हे कुटुंबाचा व समाजाचे मार्गदर्शक असून समाजाचा एक महत्वपूर्ण घटक आहे, ज्येष्ठ नागरिकांना समाजात योग्य तो सन्मान मिळावा, त्यांचे राहणीमान सुसह्य व्हावे, आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्याच्या महायुती सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.आज गोंदिया स्थित स्वागत लॉन येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघ गोंदियाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला मुख्य अतिथी म्हणून माजी आमदार राजेंद्र जैन बोलत होते.

माजी आमदार श्री जैन पुढे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांच्या हिताची काळजी घेऊन सरकार च्या वतीने वयोश्री, तिर्थदर्शन सारख्या विविध योजना राबविल्या जात आहेत. त्याचबरोबर सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या व्यक्तींना एकत्र आणून त्यांच्या दीर्घ सेवेतील अनुभवाचा लाभ समाजाला मिळावा, त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी ते कार्यरत रहावेत या उद्देशाने सोयी – सुविधा देण्याचे काम सरकार करीत आहे. भविष्यात सुध्दा खा. श्री प्रफुल पटेलजी यांच्या माध्यमातून जेष्ठ नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन त्यांनी केले.

यावेळी डी यु रहांगडाले, माधुरी नासरे, दुलिचंद बुद्धे, ऍड लखनसिह कटरे, नारायण प्रसाद जमईवार, अनुप शुक्ला यांच्या सह मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.