गोंदिया,दि.१०ः- जिल्हयात रात्रभर आलेल्या जोरदार पावसामुळे अतिवृष्टी झाली असून शहरातील नाले ओसंडून वाहत आहेत.अतिवृष्टीमुळे अनेक वार्डातील रस्ते जलमय झाले असून घऱात पाणी शिरल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे.त्यातच फुलचून नाका येथील दुर्गाभैय्या पोहे वाल्याच्या मागे नाल्याला लागून असलेल्या संपूर्ण घर कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.गोंदिया शहरातील राणी अवंतीबाई चौकात ३ फूट पाणी रस्त्यावरुन वाहत आहे.तसेच शेजारील परिसर जलमय झालेला आहे.राजाभोज काॅलनी सुध्दा पाण्याखाली आली आहे.अंडरग्राऊंड पुलाखालीही पाणी साचले.
आज दि. 10/09/2023 ला 01:00 वा सिरपूर धरणाच्यां * पाणी पातळीत वाढ होत आहे त्यामुळे धरण सुस्थीतीत/ नियंत्रणाकरीता जलाशय परिचलन आराखडा प्रमाणे धरणाचे वक्रद्वार सुरु करण्यात येत आहे 07 वक्रद्वार (गेट) 1.80 मी.ने सुरू करण्यात आला आहे. यामधून 1012.73 क्युमेक ( 35763.547 क्युसेक ) विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
पुजारीटोला धरणाच्यां * पाणी पातळीत वाढ होत आहे त्यामुळे धरण सुस्थीतीत/ नियंत्रणाकरीता जलाशय परिचलन आराखडा प्रमाणे धरणाचे गेट सुरू करुन * ( 13 वक्रदवार (गेट) 1.20 मी. ने उघडण्यात आले आहे. यामधून *1137 क्युमेक * ( 40148 क्युसेक )* विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहेm¡
कालीसरार धरणाच्यां * पाणी पातळीत वाढ होत आहे त्यामुळे धरण सुस्थीतीत/ नियंत्रणाकरीता जलाशय परिचलन आराखडा प्रमाणे धरणाचे वक्रद्वार (गेट) उघडण्यात येत आहे * (4 वक्रद्वार (गेट) 0.90 मी.) व उघडण्यात आले आहे. यामधून *334.094 क्युमेक (11800 क्युसेक ) विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहेm¡
सिरपूर धरणाच्यां * पाणी पातळीत वाढ होत आहे त्यामुळे धरण सुस्थीतीत/ नियंत्रणाकरीता जलाशय परिचलन आराखडा प्रमाणे धरणाचे वक्रद्वार सुरु करण्यात येत आहे 07 वक्रद्वार (गेट) 2.40 मी.ने सुरू करण्यात आला आहे. यामधून 1300.28 क्युमेक ( 45923 क्युसेक ) विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.