गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर,शाळांना सुट्टी,अनेक मार्ग बंद

0
562

गोंदिया,दि.१०ः जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर मंगळवारी दुसर्‍या दिवशी कायम असून जिल्ह्य़ात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे ८ ही तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.गोंदिया येथे पावसामुळे घर कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे.तर देवरी तालुक्यातील बाघ नदी पात्रात शिरपूर मध्ये अडकलेल्या दोन इसमांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.त्याचप्रमाणे शिरपूर येथील तिघांना रेस्कुकरुन बाहेर काढण्ात आले.तर सिरपूरजवळील रस्ता ओलांडताना पेट्रोलचा टॅंकर वाहून गेल्याची घटनाही आज उघडकीस आली आहे.
शहारासह जिल्ह्याला मध्यरात्रीपासून जोरदार पावसाने झोडपून काढले. यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचून नागरिकांची तारांबळ उडाली. कित्येकांच्या घरात पाणी शिरले, साहित्यांची प्रचंड नासाडी झाली.गोरेगाव येथे सुध्दा घऱामध्ये पाणी शिरले आहे.
पावसाचा जोर कायम असून जिल्ह्य़ातील पुजारीटोला, कालीसरार, शिरपूरबांध धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. यामुळे नदी काठालगतच्या ९५ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर नदीनाल्यांना पूर आल्याने काही मार्ग बंद झाले आहेत.जिल्ह्यातील पुरपरिस्थिती बघून जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
शहरातील फुलचूर नाका परिसरात नाला काठावरील घर धराशाही झाल्याने घरातील अनिल अग्रवाल यांचे संपूर्ण कुटुंब ढिगार्‍याखाली आले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. शहरातील राणी अवंतीबाई चौकात ३ फूट पाणी रस्त्यावरुन वाहत होते.त्यातच या चौकातील सहयोग रुग्णालयात पाणी शिरल्याने रुग्णालयाचे बेहाल झाल्याचे  चित्र बघावयास मिळाले. हनुमान नगर, अयोध्या नगर, गजानन कालोनी, इंद्रप्रस्थ कालोनी, न्यू लक्ष्मी नगर, राजाभोज कॉलनी परिसर, कुडवा नाका परिसर, रामनगर परिसर जलमय झाल्याचे दृश्य होते.मुख्य बसस्थानकात साचलेले पाणी बाहेर काढण्याकरीता बसस्थानकाची सुरक्षा भिंत फोडल्याने ते पाणी मागच्या भागातील घरामध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.

 
शहरातील हनुमान नगर, अयोध्या नगर, गजानन कालोनी, इंद्रप्रस्थ कालोनी, न्यू लक्ष्मी नगर, राजाभोज कॉलनी परिसर, कुडवा नाका परिसर, रामनगर परिसर जलमय झाल्याचे दृश्य होते.
जिल्हयातील घोनाडी नाल्यावरील चिचगड ते नवेगावबांध मार्ग,पळसगाव ते तुमडीमेंढा,खजरी ते डव्वा,परसोडी ते ककोडी,मोहगाव ते गडेगाव,गोरेगाव ते कालीमाटी,कामठा ते आमगाव,फुलचूर ते मोहगाव बु.,तिरोडा-गोंदिया आदी रस्ते बंद पडले आहेत.   आज दि. 10/09/2024 ला 13:00 वा कालीसरार धरणाच्यां * पाणी पातळीत घट होत आहे त्यामुळे धरण सुस्थीतीत/ नियंत्रणाकरीता जलाशय परिचलन आराखडा प्रमाणे धरणाचे वक्रद्वार (गेट) उघडण्यात येत आहे * (सर्व 4 वक्रद्वार (गेट) 1.20 मी.) ने उघडण्यात आले आहे. यामधून *432.82 क्युमेक (15286 क्युसेक ) विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे