मुंडीपार येथे जि.प.सदस्य डाॅ.भगत यांच्या हस्ते अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण

0
228

गोरेगाव,दि.११- तालुक्यातील मुंडीपार येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात नवनिर्मित अंगणवााडी इमारतीचे लोकार्पण जिल्हा परिषद सदस्य डाॅ.लक्ष्मण भगत यांच्या हस्ते आज बुधवारला करण्यात आले.अध्य़क्षस्थानी सरपंच प्रेमलता नरेश राऊत होत्या.यावेळी ग्रामपंचाय सचिव अरविंद के. साखरे,उपसरपंच भाऊलाल कटरे,ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री जावेद खान,दिनेश दीक्षित,चंद्रशेखर सहारे,चुनीलाल चाचरे,सौ. शामकलाताई खंडवाये,सौ. सरिताताई सुरजोसे,सौ. माधुरीताई चौधरी,सौ.भूमेश्वरीताई पारधी,सौ.आम्रपालीताई राऊत,सौ.संगीताताई सरजारे,पोलीस पाटील विलास सिंधीमेश्राम,तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष घनशाम बिसेन,सुनिल वाघाडे,रोहित पांडे,अजय नेवारे,रवि गमधरे आदी उपस्थित होते.