= सुरगांव येथे बुध्द मुर्तीचे अनावरण
अर्जुनी मोर.-जगात दुःख आहे ,याचा शोध तथागत बुद्धांनी लावला व त्यावर उपायही शोधून काढला अष्टांगिक मार्गाचे आचरण केल्यास आपण दुःख सागरातून मुक्त होऊन सुख सागरात गेल्याशिवाय राहणार नाही. जगात तथागत बुद्धाचे एक वेगळे अस्तित्व आहे. बुद्धानंतर सम्राट अशोकांनी बुद्धाचा धम्म जगात पोहोचविला. सम्राट अशोका नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माला पुनर्जीवित केले. बुद्धाचा धम्म प्रज्ञा शील करूनेचा आहे. याच आधारावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून समता न्याय बंधुत्व मिळवून दिले. बुद्धाचा धम्म आचरणाचा आहे. आणि आचरणातून आपण कोणत्याही अडचणीवर मात करू शकतो त्यासाठी बुद्ध धम्माच्या आचरणाची ज्योत सदैव तेवत ठेवा असे आवाहन माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
रमाई बुद्ध विहार सुरगाव/ चापटी येथे 11 सप्टेंबरला आयोजित बुद्ध मूर्ती अनावर प्रसंगी कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून माजी मंत्री बडोले बोलत होते, यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यशवंत गणवीर, जिल्हा परिषद सदस्य रचना गाहाणे, बाजार समितीचे संचालक व्यंकट खोब्रागडे, पत्रकार सुरेंद्रकुमार ठवरे, उपसभापती होमराज पुस्तोडे, राजकुमार बडोले फाउंडेशनचे राकेश भास्कर, सुभाष मेश्राम, चंद्रभान बनसोड, किशोर बेलखोडे ,श्रावण मेंढे, धर्मेंद्र गजभिये, डेनी डोये, शीलाताई मेश्राम, विश्वलता खोब्रागडे, युवराज तरोणे ,प्रमोद खोब्रागडे, सीता ताई शेंडे, सरोज बांबोडे, चंद्रकुमार मेश्राम व अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वप्रथम राजकुमार बडोले व गगन मलिक फाउंडेशन च्या वतीने दान दिलेल्या बुद्ध मूर्तीचे अनावरण व पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण माजी मंत्री राजकुमार बडोले यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी बुद्ध वंदना व त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. समाज बांधवांना मार्गदर्शन करताना रचनाताई गव्हाणे म्हणाले की बुद्धाचा धम्म हा शांततेचा आहे. आज जगाला युद्धाची नवे तर बुद्धाच्या शांतीची गरज आहे. बुद्धांनी दिलेल्या पंचशीला मधे आपली जीवनशैली बदलण्याची ताकद आहे. बाबासाहेबांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला सुशिक्षित शिक्षित समाजाची संकल्पना याचे सर्वांनी पालन करण्याचा व संकल्प करण्याचे आव्हान केले. यशवंत गणवीर यांनी बुद्धाचे विचार अंगीकारून डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकारांचा लाभ घ्यावा. सर्वांनी समाजाच्या उत्थानासाठी एकजूट होऊन लढावे असे आवाहन केले. प्रास्ताविक संचालन व आभार प्रदर्शन सुधीर खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी रमाई बुद्ध विहार समितीचे टेकचंद मेश्राम, चंद्रकुमार मेश्राम, देवदास शेंडे, सुजाता मेश्राम, मनोज दामले, कैलास मेश्राम, संदीप खोब्रागडे, समीर खोब्रागडे, तुलसीदास मेश्राम ,नितेश मेश्राम, रजनीश खोब्रागडे व समाज बांधवांनी परिश्रम घेतले सामुहिक भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.