सदस्यांच्या तक्रारीचे निराकरण करा- जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते

0
106

भंडारा दि. 13 – ग्राहक संरक्षण परिषदेमध्ये सदस्यांनी केलेल्या विविध विभागाशी संबंधित ग्राहक हिताच्या तक्रारींचे निराकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते यांनी दिले. नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांचे अध्यक्षतेखाली ग्राहक संरक्षण परिषदेची ही पहिलीच बैठक होती . या बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी केले.

 या बैठकीला जिल्हा ग्राहक संघटनेचे शासकिय सदस्य  प्रशांत देशमुख  (अन्न)  पराग शंभरकर कामगार अधिकारी रा.प भंडाराएस. सी. अंवादे शिक्षण विस्तार अधिकारी प्राथमिक. सतिश जाधव सह. प्रा.प.अ उप प्रादेशिक परिवाहन कार्यालय भंडारासतिश बन्सोड (रा.पो.नि) जिल्हा विशेष शाखा पोलिस अधिक्षक कार्यालय भंडारा आर. जि. ठाकरे सहा जिल्हा पुरवठा अधिकारी. एस.जि. टोंग धान्य खरेदी अधिकारी भंडाराजिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ इत्यादी तसेच अशासकिय सदस्य सर्वश्री. प्रकाश अ. कुरडेहेमंत साकुरेधंनजय मुलकलवारजयंत सवजीवालेरवींद्र तायडेप्रेमराज मोहकारस्वप्नील थानथराटेविजय आनंदराव जाधव ग्राहक संघटनेचे प्रतिनिधीक्रिष्णा नारायण खेडीकरडॉ. नितीन तुरसकर हे उपस्थितीत होते. जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी अध्यक्षांचे स्वागत करुन व सर्व उपस्थितांचे स्वागत करुन सभेला सुरुवात केली.

 या सभेत विविध ग्राहकांच्या समस्येवर सांगोपांग चर्चा करण्यात आली. प्रामुख्याने सर्व शांळामध्ये व शिकवणी वर्गांमध्ये सी.सी. टिव्ही कॅमेरे लावण्यात यावे. असे अशासकिय सदस्यांनी सुचना केली. त्यावर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी 248 शांळामध्ये सी.सी. टिव्ही कॅमेरे लावण्यात आले असल्याची माहिती दिली व ऑक्टोंबर महिन्यांच्या अखेरीस सर्व शाळांमध्ये सी.सी. टिव्ही कॅमेरे लावण्यात येतील असे सांगितले. सध्या पावसाचे दिवस सुरु असुन मलेरियाडेंगुचिकनगुनिया यासारख्या रोगांच्या साथी पसरु नये या दृष्टिकोणातुन फवारणी करावी तसेच आवश्यक त्या उपाय योजना करण्यात याव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी महोदयांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्यात. अध्यक्ष महोदयांनी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांनी सुचविलेले उपाय हे प्रशासनामध्ये काम करतांना महत्वाचे असुन त्यामुळे प्रशासनाला ग्राहक समस्यांचे निवारण करण्यासाठी मोलाची संधी मिळत असते त्यामुळे माडण्यात आलेल्या सर्व समस्यांवर आवश्यक ती उपाययोजना करुन सात दिवसाचे आत अनुपालन अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी भंडारा यांचे कडे सादर करावे असे निर्देश दिले.