जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे पोक्सो कायद्यावर पथनाट्य

0
42
वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाशिम,दि.१3 सप्टेंबर-महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणच्या आदेशान्वये वाशीम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या वतीने गणेशोत्सव दरम्यान विविध गणेश मंडळासमोर पोक्सो कायद्याच्या जनजागृती करीता पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येत आहे.पोक्सो कायदा काय आहे त्याची माहिती जनतेला होऊन त्याची योग्य ती अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने सदर पथनाट्य विविध ठिकाणी सादर केले जात आहे. या पथनाट्याची सुरुवात ८ सप्टेंबर रोजी संत निरंकारी भवन येथून करण्यात आली. त्याच दिवशी संध्याकाळी ८ वाजता पाटणी चौकातील नवभारत गणेशोत्सव मंडळ येथे तर ९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ८ वाजता स्थानिक मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळासमोर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. मुख्य लोकअभिरक्षक ऍड. परमेश्वर शेळके यांच्या मार्गदर्शनात उपमुख्य लोकअभिरक्षक ऍड.राजेंद्र विसपुते यांनी हे पथनाट्य लिहून दिग्दर्शित केले या पथनाट्यात विधी स्वयंसेवक सुशील भीमजियाणी, शाहीर उत्तम ओंकार इंगोले,मोतीराम खडसे,प्रभु कांबळे, शितल बन्सोड, राजकुमार पडघान,माधव डोंगरदिवे,जगदीश मानवतकर, संध्या सभादींडे, स्नेहल इंगोले आदींनी अभिनय केला. गणेशोत्सवाच्या दरम्यान संपूर्ण दहा दिवस या पथनाच्याचे वाशिम शहर व तालुक्यात सादरीकरण होणार आहे.