देवरी येथे प्रा.श्याम मानव यांचे जाहीर व्याख्यान येत्या शनिवारी

0
50

■ भारतीय लोकशाही पुढील आव्हाने व संविधान बचाओ-महाराष्ट्र बचाओ या विषयावर व्याख्यान

देवरी,दि.१८: अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती शाखा देवरीच्या वतीने शनिवार (दि.२१) रोजी सायंकाळी ५ वाजता स्थानिक सीताराम मंगल कार्यालय येथे राजकीय विश्लेषक तथा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक संघटक व्याख्याते प्रा. श्याम मानव यांचे भारतीय लोकशाही पुढील आव्हाने व संविधान बचाओ-महाराष्ट्र बचाओ या विषयावर जाहीर व्याख्यानचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे हे राहणार आहेत. या प्रसंगी प्रसिध्द विचारवंत दशरथ मडावी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात परीसरातील जास्तीत जास्त सुशिक्षीत लोकानी आवर्जुन उपस्थित राहण्याचे आव्हान अ.भा.अंधश्रद्धा निर्मुलन समिती शाखा देवरी च्या वतीने करण्यात आले आहे.