देवरी,दि.१८: तालुक्यातील मुरपार येथे रस्ते व नाल्यांची दुरावस्था झाल्याने मागील अनेक दिवसांपासून रस्ता व नाली बांधकामाची मागणी गावकऱ्यांकडून सतत केली जात होती. आमदार सहसराम कोरोटे यांनी पाठपुरावा करून सदर कामांसाठीं १ कोटीचा निधी मंजुर करवून घेतला आहे. दरम्यान, शनिवार (दि.१४) रोजी आ. कोरोटे यांच्या हस्ते नाली’ व सिमेंट रस्ता बांकामाचे भूमिपूजन पार पडले.
याप्रसंगी सरपंच दुर्गा उईके, उपसरपंच कृष्णकुमार आचले, मंसाराम उईके, गोविंदराव येटरे, हेमप्रकाश आचलें, बलीराम कोटवार, युवककाँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष दिपक (राजा) कोरोटे, कलीराम किरसान, जैपाल प्रधान, आकेश उईके, नुरेश नंदेश्वर, संजू कोरे, नरेश शूत, सुभाष मेळे, कैलाश घासले व ग्रा.पं. सदस्य, कांग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गावातील महिला, पूरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.