अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा विहीरीत पडुन दुर्देवी मृत्यु

0
116

अर्जुनी मोर.– शहरातील प्रभाग पाच येथील अडीच वर्षाच्या चिमुकल्या चा विहीरीत पडुन दुर्देवी मृत्यु झाल्याची घटना 17 सप्टेंबरला दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान घडली. मृत बालकाचे नाव रेयांस संदिप शहारे असे आहे.
रेयांस हा घरासमोर खेळत असताना अचानक आईची व घरच्यांची नजर चुकवून अंगणाजवळ असलेल्या विहीरीत पडुन त्याचा दुर्देवी मृत्यु झाला.रेयांस दिसत नाही म्हणुन घरच्यांनी सर्वत्र शोधाशोध केली.पण रेयांस कुठेच सापडला नाही. प्रभागातील काही लोकांनी विहीरीत डोकावुन पाहीले असता सदर बालक नजरेश पडला.लगेच त्याला बाहेर काडण्यात आले.व दवाखान्यात नेले असता तो पर्यंत बालकाचा मृत्यु झाला होता.अचानक घडलेल्या या दुर्देवी घटनेमुळे शहारे कुटुंबावर दु:खाचा पहाड कोसळला असुन शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.