ओबीसी बहुजन आघाडी अमरावती विभागीय समाज कल्याण कार्यालयासमोर २५ ला धरणे आंदोलन

0
62

अमरावती,दि.२२ः ओबीसी विद्यार्थ्यांसाठीचे स्वतंत्र वसतीगृह अद्यावत सोयी सुविधा करून सुरू करण्यात यावे या मागणीसाठी तसेच अंतरवाली सराटी जि. जालना येथे ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या वतीने आरक्षण बचाव आमरण उपोषण सुरू आहे. त्याला पाठिंबा म्हणून सुद्धा ओबीसी बहुजन आघाडी अमरावती जिल्ह्याच्या वतीने विभागीय समाज कल्याण भवन समोर बुधवारला(दिनांक २५)एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र असे ७२ वसतीगृह राज्य शासनाने मंजूर केले आहे. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात अद्यावत सोयी सुविधा करून ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठीचे वसतीगृह सुरू करण्यात यावे या मागणीसाठी तथा अंतरवाली सराटी येथे ओबीसी बहुजन भटक्या विमुक्त जाती जमातीच्या वतीने आरक्षण बचाव आमरण उपोषण सुरू आहे. यात बाळासाहेब बटुळे (मामा) ,ऍड. मंगेश ससाने ,संतोष वीरकर, शरद राठोड, प्रा. विठ्ठल तळेकर ,बाळासाहेब दखणे या ६ योद्धांचे आमरण उपोषण सुरू आहे . याची दखल राज्य शासन व प्रशासनाने घेतली नाही. परिणामी ओबीसीच्या भावना तीव्र झालेल्या आहेत. याला पाठिंबा म्हणून ओबीसी बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पेटकर यांच्या नेतृत्वात तसेच आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा विदर्भ प्रभारी डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांच्या उपस्थितीत , ओबीसी जन-मोर्च्याचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर विलास काळे.विभागीय समाज कल्याण भवन समोर एक दिवसीय धरणे आंदोलन सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत आयोजित करण्यात आले आहे.या धरणे आंदोलनास जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रवीण पेटकर यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.