गोंदिया,दि.२३ः- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानथंम यांनी शनिवारी आरोग्य संस्थाना आकस्मिक भेट देवुन आरोग्य संस्थेत देत असलेल्या आरोग्य सेवा व सुविधाची पाहणी केली.प्राथमिक आरोग्य केंद्र ठाणा व खमारी ह्यांचा समावेश होता.
भेटी दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रातील आतील व बाहेरील परिसराची स्वच्छता,बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी) दरम्यानच्या वेळेत मिळत असलेल्या रुग्ण सुविधा, क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे नियमित गावनिहाय भेटीचे नियोजन,पर्यवेक्षांनी उपकेंद्रांना भेटी, सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा,औषधी साठा,शासकिय निवास्थान ई.विविध बाबींचा आढावा घेवुन मुख्यालय राहणे,रुग्णसुविधा गुणवत्तापुर्वक देणे,सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करण्यात यावी,कर्मचारी यांनी कर्तव्यस्थानी ओळखपत्र व ड्रेस कोड नियमांचे काटेकोरपणे पालन करावे,आरोग्य संस्थाचे रेकॉर्ड अद्यावत करुन मुख्यालयी राहण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या.
भेटी दरम्यान प्राथमिक आरोग्य ठाणा येथे आशा सेविका यांच्या सभेला सुद्धा मार्गदर्शन केले. आशा ही गावपातळीवरील लोकांशी हितगुज करण्यासाठी महत्वाचा दुवा असुन गावातील सर्व प्रकारची माहीती आशाला असते.गावातील नागरिक मोठ्या विश्वासाने कुठलाही त्रास जाणवल्यास आशा सेविका कडे जावुन प्रतिबंधात्मक उपाययोजना व माहीती जाणुन घेत असतात तरी आशांनी लोकांना गुणवत्तापुर्वक सेवा देवुन गरोदर माता व बालकांचा गृहभेटीत नियमित फॉलोअप घेवुन शासनाच्या सर्व योजनांची माहीती लोकांपर्यंत पोहचविण्याचे निर्देश आशांच्या सभेत दिले.
प्राथमिक आरोग्य केंद्र खमारी येथील भेटीत मानव विकास शिबीरादरम्यान गरोदर माताशी हितगुज करुन देण्यात येणार्या आरोग्य सेवांची माहीती जाणुन घेतली. आरोग्य संस्थेतील अधिकारी व कर्मचारी यांनी गृहभेटीत संशयित लक्षणे असलेल्या लोकांची तपासणी करुन जलद तपासणी व उपचार करुन आरोग्य शिक्षण जनजागृतीवर प्राधान्य देणे गरजेचे म्हटले आहे.अतिजोखमीच्या लोकांची यादी बनवुन त्यांना प्राधान्याने नियमित भेटी देणे आवश्यक असल्याचे सांगितले.
भेटि दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र खमारी येथे वैद्यकिय अधिकारी डॉ.खुशबु शर्मा,आरोग्य सहाय्यक गजेंद्र तावाडे व जे.सी.साव, फार्मासिस्ट चिर्डे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी शकील शेख,आरोग्य सेविका माधुरी टेंभुरकर, शालु राऊत व लक्ष्मी राऊत,कनिष्ठ सहाय्यक दहीकर,सफाईगार ठाकरे,परिचर रामटेके व कासरे उपस्थित होते तर प्राथमिक आरोग्य केंद्र ठाणा येथे वैद्यकिय अधिकारी डॉ.सचिन बारई उपस्थित होते.