जागतिक रेबीज दिवस निमीत्ताने जनजागृती रॅली

0
41

गोंदिया,दि.२८ः-रेबीजबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी आणि लोकांना या प्राणघातक आजारापासून वाचवण्यासाठी दरवर्षी 28 सप्टेंबर रोजी जगभरात जागतिक रेबीज दिन साजरा करुन जनजागृती केली जात असल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी दिली आहे.
रेबीजची लस प्राणी आणि मानव यांच्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्याचा वापर मानवांमध्ये रेबीजचा धोका कमी करू शकतो. यावर्षी 18 वा जागतिक रेबीज दिन साजरा केला जात आहे. रेबीज दिन दरवर्षी नवीन थीमसह साजरा केला जातो आणि यावर्षीची थीम, “ब्रेकिंग रेबीज बाउंडरीज” मराठीत रेबीज सीमा तोडणे असे असल्याचे जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ.अमरिष मोहबे यांनी म्हटले आहे.
पाळीव प्राणी आणि वन्यजीवांचे लसीकरण, अज्ञात प्राण्यांशी संपर्क टाळणे, रेबीजच्या धोक्यांबद्दल समुदायांना शिक्षित करणे आणि संभाव्य संपर्कानंतर त्वरित वैद्यकीय मदत घेणे याद्वारे रेबीजला प्रतिबंध केला जाऊ शकत असल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे यांनी म्हटले आहे.
जिल्हा आरोग्य प्रशासन, के.टी.एस.सामान्य रुग्णालय व राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या एकत्रित सहकार्याने जागतिक रेबीज दिन अनुशंगाने दि.28 सप्टेंबर रोजी प्रभातफेरी माध्यमातुन जनजागृती करण्यात आली. जनजागृती प्रभातफेरी केटीएस सामान्य सामान्य रुग्णालय येथुन रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे यांनी हिरवी झेंडी दाखवुन रॅलीचे उदघाटन केले.प्रभातफेरी केटीएस सामान्य रुग्णालय येथून ईंगळे चौक- सिव्हील लाईन-प्रशासकीय ईमारत-जयस्तंभ चौक भागात प्रभातफेरी काढण्यात आली. विविध संदेश देत जनजागृती करण्यात आली. प्रभात फेरी द्वारे समाजामध्ये जनजागृती निर्माण होण्यासाठी विविध प्रकारचे माहिती फलक विध्यार्थ्यानी घेऊन फेरीत सहभाग घेतला.
प्रभातफेरीत बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील नर्सिंग कॉलेजने विद्यार्थी यांनी जनजागृती केली.प्रभातफेरी दरम्यान निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.भारती ज़ायस्वाल, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरंजन अग्रवाल,वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय घोरमारे,अंसासर्गिक आजार कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.स्नेहा वंजारी, राष्ट्रीय तंबाखु नियत्रंण कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.अनिल आटे,जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी विजय आखाडे,जिल्हा आय.ई.सी अधिकारी प्रशांत खरात,ऑडीयोमेट्रीक तज्ञ रोशन कुर्वे यांचे समवेत के.टी.एस. सामान्य रुग्णालयाचे इतर अधिकारी/कर्मचारी वर्ग उपस्थित होते.