गडचिरोली,दि.01: आज 1 ऑक्टोबर या ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ मतदरांचा त्यांच्या निवडणूकीतील
योगदानासाठी प्रशस्तीपत्र देवून जिल्हा प्रशासनाद्वारे सत्कार करण्यात आला. प्रभारी जिल्हाधिकारी आयुषी सिंह,
उपवनसंरक्षक मिलिशदत्त शर्मा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
राजेंद्र भुयार, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी प्रसेनजीत प्रधाण यांच्या हस्ते ज्येष्ठ
मतदारांना नियोजन भवन येथे प्रत्यक्ष त्यांच्या जागेवर जावून सन्मानित करण्यात आले.
यावेळी श्री घोडके यांनी निवडणूक आयोगाच्या संदेशाचे वाचन करून लोकसभा निवडणूकीत लोकशाही
प्रक्रीयेत सहभाग नोंदविल्याबद्दल ज्येष्ठ मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी मतदान प्रक्रीयेत ज्येष्ठ
नागरिकांसाठीच्या सुविधेतीची माहिती देवून 85 वर्षावरील मतदारांनी फॉर्म-12 भरून घरबसल्या मतदान
करण्याबाबतच्या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक, निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार अमोल गव्हारे व कर्मचारी
उपस्थित होते.