गोंदिया : जिल्हयात दिनांक- 03-10-2024 रोजी ते दिनांक- 12-10-2024 या कालावधीत नवरात्र उत्सव मोठ्या भक्तीभावाने उत्साहाने साजरा होणार आहे. 03-10-2024 (गुरुवार) ला घटस्थापना, दिनांक-11-10-2024 शुक्रवार ला (दुर्गाष्टमी), व महानवमी व दिनांक- 12-10-2024 रोज शनिवार ला विजयादशमी (दसरा सण) व (धम्मचक्र प्रवर्तन दिन) साजरा होणार आहे. नवरात्रौत्सव निमित्त सार्वजनिक ठिकाणी दुर्गा/शारदा देवी मुर्तीची प्रतिष्ठापना पुजन करण्यात येणार असून देवी मंदिरात मोठया संख्येने ज्योतिकलश ठेवण्यात येतात.त्या दरम्यान सार्वजनिक मंडळातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येवून मोठ्या भक्तीभावाने उत्सव साजरा करण्यात येतो.अशाप्रकारे नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. त्यानुसार सदर नवरात्रोत्सव निमित्याने शासन व स्थानिक प्रशासना कडुन विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सदर उत्सव शांततेत व सौहार्दपुर्ण वातावरणात उत्साहात साजरा व्हावा यासाठी वरिष्ठांकडुन वेळोवेळी मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. सदर उत्सव हा शांततापूर्वक संपन्न व्हावा हा बंदोबस्ताचा मुख्य उद्देश आहे.
गतवर्षी 2023 ला नवरात्रोत्सव
गोंदिया जिल्ह्यात सार्वजानिक दुर्गा मूर्ती- 585 शारदामुर्ती- 575, ची प्रतिष्ठापना करण्यात आले होते. त्याचप्रमाणे रावणदहन- 29, गरबा- 32 ठिकाणी सार्वजनिक रित्या आयोजन करण्यात आले होते. गतवर्षी उत्सव अतिशय उत्साहात, शांततेत, कायदा सुव्यवस्था राखून शांततेत पार पाडण्यात आले.
यावर्षी नवरात्रोत्सव सण- 2024 ला संभाव्य दुर्गा – शारदा मूर्तीची प्रतिष्ठापना
गतवर्षीच्या तुलनेत 2024 मध्ये गोंदिया जिल्ह्यात संभाव्य- एकूण सार्वजानिक दुर्गा मूर्ती प्रतिष्ठापना- 598 ठिकाणी , शारदा- 589, रावणदहन -18, गरबा- 39 चे सार्वजनिकरित्या, आयोजन करण्यात येणार असून उत्सव साजरा करण्यात येणार आहे..
नवरात्रोत्सव- 2024 च्या निमित्याने गोंदिया जिल्हा पोलीस बंदोबस्त रूपरेषा
पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांचे संपूर्ण नियंत्रणात आणि मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक, कॅम्प देवरी नित्यानंद झा, यांचे संपूर्ण देखरेखीखाली गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा, आमगाव, देवरी या 4 उपविभागातील उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे संपुर्ण नियंत्रणात आणि देखरेखीखाली उपविभागाअंतर्गत असलेल्या एकूण 16 पोलीस ठाण्याचे ठाणेदार, यांचे नेतृत्वात आणि संपूर्ण देखरेखीखाली यावर्षी सन-2024 ला गोंदिया जिल्ह्यातील नवरात्र उत्सव शांतापूर्ण वातावरणात, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज करण्यात आले असून उत्सव पार पाडण्यात येणार आहे.
पोलीसांची कोणावर विशेष करडी नजर असणार
गर्दीचा फायदा घेऊन महीला, मुलींची छेड काढणाऱ्या, छप्रीबाजी, चीडीमारी करणाऱ्या टपोरी, खिसेकापू, चोरी, पॉकेटमारी करणाऱ्या विरूद्ध संपुर्ण 16 पोलीस ठाण्या अंतर्गत विशेष छेडछाड विरोधी पथके, गस्ती पथके तयार करण्यात आले असून या पथकांद्वारें विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असून मोहीम राबविण्यात येवून कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे… त्याचप्रमाणे समाजकंटक, गुंड प्रवृत्तीच्या इसमावर खाजगी तसेच गणवेशातील महिला , पुरूष, पोलीस अधिकारी अंमलदार, चार्ली पथक, दामिनी पथक, यांना सक्रिय करण्यात आले असून यांची विशेष करडी नजर असणार आहे…. त्याचप्रमाणे नवरात्र उत्सव काळात कायदा सुव्यवस्था बिघडवू पाहणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसम यांचे विरूद्ध तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या विरूद्ध कडक कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे.
नवरात्र उत्सव – 2024 दरम्यान कसा असेल पोलीस बंदोबस्त
जिल्ह्यातील 16 पोलीस ठाणे, अंतर्गत असलेले सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार, पोलीस मुख्यालय येथील आर.सी.पी, क्यू.आर.टी, पथक, सी-60 पथके, बी डी. डी. एस, मोटार परिवहन विभाग, बिनतारी संदेश विभाग, जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा पोलीस अधिकारी, अंमलदार, पोलीस अधीक्षक कार्यालय येथील सर्व शाखेतील पोलीस अधिकारी अंमलदार, त्याचप्रमाणे उत्सव संबंधाने पुरविण्यात आलेले होमगार्ड, आणि राज्य राखीव पोलीस दल, अश्याप्रकारे संपूर्ण गोंदिया जिल्हा स्तरावर साधारण 75 पोलीस अधिकारी, 600 पोलीस अंमलदार, 400 पुरुष होमगार्ड, 100 महीला होमगार्ड असा मोठा पोलीस बंदोबस्त जिल्हा स्तरावर नवरात्रोत्सव, शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दलास सज्ज करण्यात आले आहे.
नवरात्रोत्सव- 2024 च्या अनुषंगाने : गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी जिल्ह्यातील सर्व जनतेला, प्रतिष्ठित आणि सुज्ञ नागरिकांना नवरात्र उत्सव, सण शांततेत, सौहाद्रपूर्ण वातावरणात आपसी सामंजस्य ठेवून कायदा सुव्यवस्था राखून उत्साहाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे.